Quantum Educational Academy : परीक्षा प्रशिक्षण केंद्र काणकोणात सुरू

उच्च शिक्षणासाठी सोय : क्वांटम एज्युकेशनलचा उपक्रम
Rajendra Desai speaking at the inauguration of the training centre.
Rajendra Desai speaking at the inauguration of the training centre.Dainik Gomantak
Published on
Updated on

Quantum Educational Academy in Canacona: क्वांटम एज्युकेशनल अकादमीतर्फे चाररस्ता येथील सेंत्रू प्रोमोतर द इस्त्रुसांव संस्थेच्या सहकार्याने काणकोणात आयआयआय आयटी, जेईई व नीट परिक्षांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

संस्थेने यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. शतकी वाटचाल करताना नवीन उपक्रम संस्थेने सुरू केला आहे.

संस्थेच्या आमसभेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले.

यावेळी श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक प्रमोद राणे, प्राचार्य विहार देसाई, पालक ॲड. प्रतिभा गणे देसाई, संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य पुंडलिक नाईक गावकर व क्वांटम एज्युकेशनल अकादमीचे प्रशिक्षक उपस्थित होते.

Rajendra Desai speaking at the inauguration of the training centre.
New Education Policy : पहिलीत प्रवेशासाठी साडेपाच वर्षेही चालतील !

यावेळी क्वांटम एज्युकेशनल अकादमीच्या प्रशिक्षकांनी सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन वर्ग घेण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परिक्षांच्या पूर्वतयारीसाठी वर्ग घेण्यात येतील.

विद्यार्थ्यांनी आपला वेळ या प्रशिक्षणासाठी देणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज नाईक गावकर यांनी केले.

Rajendra Desai speaking at the inauguration of the training centre.
Goa Education Policy: विद्यार्थी गळतीच्या निमित्ताने...

‘स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न’

काणकोणात स्पर्धात्मक परीक्षांना लागणाऱ्या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध नसल्याने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काणकोणमधील पालक मोठ्या प्रमाणात मडगाव व पणजीसारख्या शहरात स्थलांतर होताना दिसतात.

हे स्थलांतर रोखण्याचे मोठे आव्हान काणकोण तालुक्यासमोर आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून त्याला काही प्रमाणात रोख लागणार असल्याचे मत राजेंद्र देसाई यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com