Ravindra Bhavan: रवींद्र भवन चालणार आता सौर ऊर्जेवर! गोव्यातील पहिला प्रकल्प; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

Sanquelim Ravindra Bhavan solar energy: विजेसाठी सरकारला येणारा भरमसाठ खर्च कमी करण्याचा प्रयत्न यापुढे हाती घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
Sanquelim Ravindra Bhavan solar energy
Sanquelim Ravindra Bhavan solar energyDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: स्वयंपूर्ण गोवा प्रमाणेच साखळी रवींद्र भवनही स्वयंपूर्ण बनावे व सरकारी निधी बरोबरच रवींद्र भवनचा स्वतःचा निधी उभारावा यासाठी मुख्यमंत्री तथा साखळी रवींद्र भवनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या हाकेला साखळी रवींद्र भवनच्या संचालक मंडळाने गांभीर्याने घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र भवनच्या छप्परावर पूर्णपणे सौर ऊर्जा युनिट बसविण्याच्या कामाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल फीत कापून व श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.

साखळी रवींद्र भवनने चांगला उपक्रम हाती घेतल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी म्हटले. गोवा ग्रीन एनर्जी विकास एजन्सीमार्फत सुमारे ६८ लाख रुपये खर्च करून रवींद्र भवनच्या छप्परावर हा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभावेळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर, संचालक अतुल मळीक, दिनकर घाडी, शशिकांत नार्वेकर, सातू माईणकर, अमोल बेतकीकर, श्रीरंग सावळ, स्नेहा देसाई, रविराज च्यारी, कंत्राटदार सर्वे कुंदे यांची उपस्थिती होती.

यावेळी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार साखळी रवींद्र भवनमध्ये मोठे बदल घडविण्यात आले असून रवींद्र भवन स्वयंपूर्ण बनवून आपला खर्च या रवींद्र भवनमध्ये असलेल्या विविध माध्यमांतून निर्माण करावा. हे आवाहन आम्ही गांभीर्याने घेतले असून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्याबरोबरच आता हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, असे सांगितले.

Sanquelim Ravindra Bhavan solar energy
Ravindra Bhavan Goa : रवींद्र भवनात संगीत, नाट्यकलेचे वर्ग सुरू करण्यात अडचण काय? कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा खडा सवाल

‘सरकारी इमारतींवरही सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार’

साखळी रवींद्र भवनने सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प गोव्यात प्रथमच हाती घेऊन कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. स्वयंपूर्ण रवींद्र भवन व्हावे ही आपली इच्छा आपण नवीन संचालक मंडळ स्थापन झाल्यावर प्रकट केली होती. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही करण्यात येत होता. गोव्यातील सर्व रवींद्र भवननेही स्वयंपूर्ण बनावे. सर्व सरकारी इमारतींवरही सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्थापित करून विजेसाठी सरकारला येणारा भरमसाठ खर्च कमी करण्याचा प्रयत्न यापुढे हाती घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Sanquelim Ravindra Bhavan solar energy
Ravindra Bhavan: रवींद्र भवनातील कारंजाचे उद्‍घाटन! 58 लाख खर्चून दुरुस्ती, वारंवार डागडुजीचे सत्र थांबणार?

‘दरवर्षी १ लाख ९० हजार युनिट वीज निर्मिती’

कुंडे सोलर सोल्युशन या कंत्राटदरामार्फत या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम करण्यात येणार असून प्रत्येकी ५५० व्हॉटची २२८ पॅनल छप्परावर बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे वार्षिक १ लाख ९० हजार युनिट वीज निर्मिती होणार. त्यातील रवींद्र भवनसाठी दीड लाख युनिट ही वीज वापरात येईल, तर उर्वरित अतिरिक्त वीज खात्याला पुरविली जाणार आहे. त्याद्वारे वीज खात्याकडून साखळी रवींद्र भवनला महसूल प्राप्ती होणार आहे. तसेच वीज खात्यालाही वीज मिळविण्यास या प्रकल्पाची मदत होणार, अशी माहिती गेडाचे साहाय्यक अभियंते गौरीश कवठणकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com