Sanquelim Municipal Election : विरोधकांवर सरकारचा दबाव; तरीही साखळीत टक्कर देणार

धर्मेश सगलानी : उमेदवारांना दाखविली जाताहेत विविध आमिषे
Dharmesh Saglani
Dharmesh Saglani Dainik Gomantak

साखळी : साखळी नगरपालिकेची आगामी निवडणूक ही ‘हाय व्होल्टेज’ होण्‍याची शक्‍यता आहे. आमच्या गटाच्‍या समर्थकांवर मोठा राजकीय दबाव आहे. काही प्रभागांमध्ये तर रिंगणात उतरण्यासाठी उमेदवार तयारच होत नाहीत. बाहेरून उमेदवार आयात केल्यास त्‍या प्रभागातील सूचक व अनुमोदक तयार होत नाहीत अशी परिस्थिती आहे. तरीही ‘टुगेदर फॉर साखळी’ पॅनल विरोधकांना टक्कर देईल, असा विश्‍‍वास माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

साखळी पालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही सगलानी गप्पच होते. त्यांचे एकही वक्तव्य माध्‍यमांकडे आले नव्हते. मात्र आज मंगळवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मौन सोडले. ते म्‍हणाले, पालिकेत आमच्या ‘टुगेदर फॉर साखळी’ या पॅनलचे नेते आहेत. त्यांनी सर्व प्रभागांमध्ये रणनीती आखून उमेदवार उभे केले आहेत.

या प्रक्रियेत आपलाही सहभाग होता. पडद्यामागे राहून काम करताना आपण सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन होतो. परंतु आमचे उमेदवार, समर्थकांवर सध्‍या मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आहे. काहींना विविध प्रकारची आमिषे दाखविली जात आहेत.

Dharmesh Saglani
Ponda Sanquelim: साखळी, फोंडा नगरपालिकांसाठी 118 उमेदवारी अर्ज, आज छाननी

साखळीतील लोक सध्‍या जरी शांत असले तरी ते आमच्या बाजूने आहेत. गेल्‍या दहा वर्षांत आमच्या गटाने कधीच सुडाचे राजकारण केले नाही. त्‍यामुळे या निवडणुकीतही लोकांचा आम्‍हाला निश्‍चितच पाठिंबा असेल, असा विश्‍‍वास सगलानी यांनी व्यक्त केला.

Dharmesh Saglani
Ponda Sanquelim: साखळी नराध्यक्षपद महिलांसाठी राखीव; दोन्ही नगरपालिकांसाठी 188 उमेदवारी अर्ज

साखळीच्‍या काही प्रभागांमध्‍ये नवीन उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत. कारण गेल्या निवडणुकीत आमच्या पॅनलमधून निवडून आलेले काही नगरसेवक आम्हाला अर्ध्यावरच सोडून भाजपमध्‍ये गेले. तर, काही नगरसेवक आता त्‍या पक्षात गेले आहेत. जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून नाव असलेला भाजप आज साखळीत आमच्या गटातील उमेदवार पळवत आहे व ही त्‍यांच्‍यासाठी खरोखरच लाजीरवाणी बाब होय.

- धर्मेश सगलानी, माजी नगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com