Ponda-Sanquelim Muncipality Election 2023: साखळी, फोंडा नगरपालिकांसाठी 118 उमेदवारी अर्ज, आज छाननी

भाजप, काँग्रेस, मगो समर्थक रिंगणात ः उद्या अर्ज मागे घेण्याचा दिवस
Ponda And Sanquelim Municipal Council
Ponda And Sanquelim Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda-Sanquelim Muncipality Election 2023: राज्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या फोंडा आणि साखळी नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी २७ प्रभागांकरिता ११८ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

फोंड्यातील १५ प्रभागांकरता एकूण ६१ तर साखळी नगरपालिकेच्या १२ प्रभागांकरता एकूण ५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

उद्या, बुधवारी या उमेदवारी अर्जांची छाननी होईल. २० एप्रिल रोजी अर्ज मागे घेता येतील. दरम्यान, साखळी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय आज निवडणूक आयागाने जाहीर केला आहे.

साखळी आणि फोंड्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेस आणि भाजप समर्थकांनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर फोंड्यात मगोपच्या समर्थकांनीही निवडणूक लढवण्याचे ठरवलेले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या बनलेल्या साखळी नगरपालिकेसाठी अखेरच्या दिवशी आज २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते धर्मेश सगलानी यांनी प्रभाग क्र. ४ व ९ मधून उमेदवारी दाखल केली.

आजच्या दिवसाची विशेष बाब म्हणजे प्रवीण ब्लेगन यांची कन्या भाग्यश्री यांनी प्रभाग क्र. २, ५, ६, ९ या चार प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज सादर करून विक्रमच केला आहे.

दोन लाखांची खर्च मर्यादा :

या निवडणुकीसाठी उमेदवारांना २ लाख रुपयेे खर्चाची मर्यादा असून या निवडणुका राजकीय चिन्हांवर होणार नाहीत. त्या वैयक्तिक स्तरावर लढवल्या जातील.

याशिवाय या निवडणुकामध्ये मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

Ponda And Sanquelim Municipal Council
Transfer Of Agriculture Land: गोवा कृषी जमीन हस्तांतरण निर्बंध कायदा आजपासून लागू

56 मतदारांची नावे यादीतून गायब

साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असतानाच प्रभाग सहामधील मतदारयादीतून ५६ मतदारांची नावे गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकारामुळे संबंधित मतदारांसह उमेदवारांमध्ये खळबळ माजली आहे. राजकीय दबावामुळे मतदारांची नावे जाणूनबुजून आणि बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा आरोप मतदार आणि उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

Ponda And Sanquelim Municipal Council
गोमन्तकींयासाठी खूशखबर! गडकरींनी केली 461 कोटी रूपये प्रकल्पाची घोषणा, ट्रॅफीकमधून मिळणार दिलासा

मगोप’कडे लक्ष

फोंडा पालिकेच्या १५ जागांसाठी एकूण ५५ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत. मंगळवारी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. पूर्वीचे ४१ मिळून ही संख्या ५५ वर आली आहे.

फोंडा येथे पारंपरिक काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत असली तरी अनेक प्रभागांमध्ये मगोपने समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मगोपची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com