Sanquelim : पाळी-वेळगेतील रस्ता रुंदीकरण गतीने! खाण उद्योगासाठी उपयुक्त

अपघातांनाही मिळणार विराम
Road Work
Road WorkDainik Gomantak

Sanquelim : साखळी मतदारसंघातील सर्वच रस्ते चकाचक करण्याबरोबरच रुंदीकरणावरही सध्या भर देण्यात येत आहे. पाळी-वेळगेतील रस्ते रुंद करण्याबरोबरच वाहतूकयोग्य करण्यासाठी स्थानिक आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आदेश दिल्यानंतर या कामाला चालना देण्यात आली असून रुंद रस्त्याबरोबरच हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

Road Work
Mayem kalotsav : पोलिस बंदोबस्तात कळसोत्सवाला प्रारंभ; मयेत तणाव

येत्या ‘सिझन’मध्ये खाणी सुरू होण्याची चिन्हे दिसत असल्याने त्यादृष्टीने रुंद रस्त्यांची गरज होती. विशेषतः पाळी बाजार भागाबरोबरच वेळगेतील रस्त्यांचे रुंदीकरण करताना साकवांचे कठडेही बांधून काढण्यात आले आहेत.

वास्तविक हे रस्ता रुंदीकरणाचे काम फार पूर्वी व्हायला हवे होते, पण या कामाकडे तसे फारसे लक्ष दिले गेले नाही. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्राधान्यक्रमाने या कामाला चालना देऊन साफसुथरे रस्ते उपलब्ध करून दिले.

Road Work
Arambol : पर्यटकांनीच रंगविले किनारी भागात गतिरोधक

राज्यातील खाण व्यवसाय आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठे प्रयत्न सुरू असून काही खाणींचा लिलावही झाला आहे. आता प्रत्यक्षात कामालाही सुरवात होईल. मात्र हा व्यवसाय निर्धोकपणे चालण्यासाठी कायदेकानून पाळण्याबरोबरच धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना व्हावी.

- देविदास वळवईकर, पाळी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रयत्नांमुळे खाण भागातील विशेषतः साखळी मतदारसंघातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण आणि रुंदीकरण करण्यात येत आहे. पाळी, वेळगेतील रस्ता रुंदीकरण तर फार गरजेचे होती, त्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याने आता अपघातांचा धोका दूर होणार हे निश्‍चित.

- प्रकाश नाईक, उसगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com