मुरगावमध्ये संकल्प आमोणकरांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे दिले निर्देश
Sankalp Amonkar from Four Lane Port Connectivity Project


Officers caught on edge
Sankalp Amonkar from Four Lane Port Connectivity Project Officers caught on edgeDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी गॅमन इंडियाला ड्रेनेजची कामे हाती घेण्याचा आणि फोर लेन पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा सर्व्हिस रोड 20 मे पूर्वी म्हणजेचं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे अल्टिमेटम दिले, तसेच गॅमन इंडियाला अपूर्ण कच्च्या रस्त्यावर धूळ प्रदूषण रोखण्यासाठी दोनदा पाणी स्प्रिंकलर वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

मुरगावचे (Mormugao) आमदार संकल्प आमोणकर यांनी गमन इंडियातर्फे बायणा येथे रविंद्र भवनच्या पाठीमागे उड्डाणपुलाखाली कासवगतीने चाललेल्या कामाची पाहणी करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे येथील मातीचा भराव टाकून बंद करण्यात आलेले गटार तसेच कच्च्या रस्त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पक्का रस्ता 20 मे च्या अगोदर पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून देण्याचा आदेश सोडला आहे.

गेली दहा वर्षे बायणा येथे उड्डाणपुलाचे काम चालू असून या उड्डाणपुलाखाली सर्विस रोड चे काम मात्र आजपर्यंत गेमन इंडिया कंपनीने जे या कामाचे ठेकेदार आहेत, त्याने रखडत ठेवले आहे. हा रस्ता काम चालू असल्यापासून कच्चा असल्याने या भागात राहणाऱ्या मच्छीमारी लोकांना धुळीच्या प्रदूषणात दिवस काढावे लागतात. तसेच येथील गटर कंपनीने मातीचा भराव टाकून बंद करण्यात आल्याने लोकांच्या स्नान घरातील पाणी प्रत्येकाच्या दारात वाहून तेथे डबके तयार झाले आहे. त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात तर डेंगू, मलेरिया सारखे रोग डोकं वर काढतात. त्यामुळे या ठिकाणी या रोगाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

Sankalp Amonkar from Four Lane Port Connectivity Project


Officers caught on edge
मंत्री हताश भाजपकडून सत्तेचा गैरवापर, संकल्प आमोणकरांची टीका

याविषयी स्थानिकांनी तक्रार करूनही गॅमन इंडिया कंपनीने काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने लोकांनी सांगितले.पालिकेतर्फेही या ठिकाणी दुर्लक्ष केल्याचे लोकांच्या तक्रारी आहे. गेमन इंडिया कंपनीची समजूत घालण्यास सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या भागातील लोकांच्या गेमन इंडिया कंपनीविरुद्ध वाढत्या तक्रारींना अनुसरून नवनिर्वाचित आमदार संकल्प आमोणकर यांनी मुरगाव पालिकेचे मुख्याधिकारी जयंत तारी, मूरगावचे मामलेदार रघुनाथ देसाई, स्थानिक नगरसेविका श्रद्धा आमोणकर तसेच इतर पालिका अधिकारी यांच्या बरोबर बायणा येथे रविद्र भवनच्या मागे सदर रस्त्याची व सेक्स गटारांची संयुक्तरित्या पाहणी केली असता या ठिकाणी गेमन इंडियाने दुर्लक्षित केल्यामुळे लोकांना होणारा त्रास आमदार व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.

आता या दिवसात इतकी भयावह स्थिती तर पावसाळ्यात या ठिकाणी होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन उपस्थित आमदार संकल्प आमोणकर यांनी गेमन इंडिया कंपनी अधिकाऱ्यांना बरेच धारेवर धरले. पालिका (Municipality) मुख्याधिकारी जयंत तारी यांच्या सदर परिस्थिती लक्षात येताच त्यांनी कंपनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. मान्सून सुरू होण्याआधी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी गॅमन इंडियाला ड्रेनेजची कामे हाती घेण्याचा आणि फोर लेन पोर्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचा (project) सर्व्हिस रोड 20 मे पूर्वी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे अल्टिमेटम दिले, तसेच गॅमन इंडियाला अपूर्ण कच्च्या रस्त्यावर धूळ प्रदूषण रोखण्यासाठी दोनदा पाणी स्प्रिंकलर वापरण्याचे निर्देश दिले. अन्यथा स्थानिकांच्या रोशाला जाण्यास तयार राहा असा इशारा दिला आहे. यावर इंडिया कंपनी अधिकाऱ्यांकडून काम करून देण्याचे आश्वासन आमदाराला दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com