होळीच्या दिवशी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या भांडणाला राजकीय रंग दिल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यासाठी आणि मुरगावात घरे बांधणाऱ्या लोकांना काम बंद करण्याच्या नोटीस बजावण्यासाठी राजकीय सत्तेचा गैरवापर केला जात आहे. मला माहीत नाही की त्यात मुख्यमंत्री सामील आहेत की भाजपचे हरलेले मंत्री हताश झाले आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यासाठी वीज विभागातील एक लिपिक आणि कायदेशीर मेट्रोलॉजी विभागाचा एक निरीक्षक वैयक्तिकरित्या लोकांची यादी घेत आहेत. असा आरोप मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केला.
मुरगावात अजूनही सूडबुद्धीचे राजकारण (Politics) करून सरकारी नोकरदारांच्या बदल्या, सडा भागातील घरांचे बांधकाम करताना सरकारी दबाव आणून काम बंद पाडणे, तसेच कौटुंबिक वादाला राजकीय रंग देऊन 60 जणांवर खोट्या पोलीस तक्रारी दाखल करून एका प्रकारे मुरगावात अशांती पसरविण्याचे षडयंत्र माजी आमदाराचे सरकारी अधिकारी करत आहे.
वास्को येथे आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती मुरगावचे (Mormugao) आमदार संकल्प आमोणकर यांनी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर, मुरगाव काँग्रेस गटाध्यक्ष महेश नाईक, अविनाश नाईक, सचिन भगत, शेखर दाभोळकर उपस्थित होते. पुढे माहिती देताना आमदार आमोणकर म्हणाले की मुरगाव सडा भागातील वीज विभागातील कर्मचारी जे इतर ठिकाणी असलेल्या कामावरून त्यांच्या बदल्या करण्याचे षडयंत्र वीज विभागातील वरिष्ठ कारकून परमवीर हळर्णकर व माजी आमदाराचे सहकारी लीलाधर कुंभारजुवेकर नावाचा व्यक्ती करीत असल्याचा आरोप आमदार (MLA) आमोणकर यांनी केला.
अंदाजे 30 वीज कर्मचाऱ्यांच्या बदल्या काढण्यात आल्या असून यातील 25 सडा भागातील रहिवासी आहे. सरकारी (Government) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण चुकीचे असून गरज पडल्यास न्यायासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आमदार आमोणकर यांनी दिली.
मुरगाव तालुक्यात जास्त करून नागरिकांनी आपली घरे सरकारी जमिनीवर उभारली असल्याने त्यांच्यावर होणारा अन्याय मी कदापि सहन करणार नाही. मुरगाव सडा परिसरात घराचे नूतनीकरणाचे काम सुरू असून येथे सुद्धा सूडबुद्धीचे राजकारण करून मुरगाव नगरपालिका, मुरगाव नगर नियोजन विकास प्राधिकरण बरोबर भरारी पथकामार्फत घरे बांधण्याचे काम बंद पाडण्यात येत आहे. येथे सुद्धा सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली आहे.
सडा भागातील नागरिकांमध्ये एकाप्रकारे भय निर्माण करून येथे अशांती पसरविण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप आमोकर यांनी केला. तसेच होळीनिमित्त मुरगाव बोगदा परिसरात कौटुंबिक वादाला राजकारण करून अंदाजे 69 जणांवर खोट्या पोलिस तक्रारी दाखल करून पोलीस महासंचालकांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. सदर 60 जणांवर दोन प्रकारे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर अन्याय केला असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली आहे. या मारहाणीत आणखीन चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील काही सरकारी कामगार असल्याची माहिती आमोणकर यांनी दिली.
गोव्यात विधानसभा निवडणूक संपून काही सत्ताधारी आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली तरी मुरगावात मात्र अजूनही राजकीय षडयंत्र करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री या प्रकरणी लक्ष घालून मुरगावतील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी शेवटी आमदार संकल्प आमोणकर यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.