अर्थसंकल्पावरून आमोणकरांनी घेतला मुख्यमंत्र्यांचा समाचार

राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारची कोणतीही योजना नाही; संकल्प आमोणकर
Sankalp Amonkar criticizes Chief Minister Pramod Sawant over budget
Sankalp Amonkar criticizes Chief Minister Pramod Sawant over budgetDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर म्हणाले की, कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा जिवंत करण्याचे कोणतेही धोरण नसल्याने हा अर्थसंकल्प म्हणजे गोव्यातील जनतेला लुबाडण्याची एक 'कॉपी अँड पेस्ट' कसरत आहे. बेजबाबदार मुख्यमंत्र्यांना गोव्याच्या प्रगती संदर्भात दृष्टी नाही, म्हणून ते पूर्वीच्या अर्थसंकल्पातील मजकूर कॉपी करून नवीन अर्थसंकल्पात पेस्ट करण्याची कसरत करतात, असा आरोप आमोणकर यांनी केला.

“प्रमोद सावंत (Pramod Sawant) इतके दिवस दिल्लीतील आपल्या बॉसला प्रभावित करण्यासाठी शपथविधी समारंभ आयोजित करण्यात व्यस्त होते. त्याआधी ते मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंगमध्ये व्यस्त होते आणि पुन्हा पुन्हा दिल्लीला जात होते. खुर्ची टिकवून ठेवण्याची ही कसरत करत असताना त्यांना अर्थसंकल्प (budget) तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही अशी मला खात्री आहे. अशी टीका आमदार संकल्प आमोणकर यांनी केली आहे.

Sankalp Amonkar criticizes Chief Minister Pramod Sawant over budget
गोवेकरांच्या शिक्षणासाठी सरकारकडून 3850.98 कोटींची खास तरतूद

पुढे बोलताना ते म्हणाले की 2022-23 आर्थिक वर्षासाठी पुर्वीच्याच योजना आणि प्रकल्पांसह सादर केलेला अर्थसंकल्प नजीकच्या भविष्यात भाजप सरकारचा पर्दाफाश करेल. आम्ही गोव्यातील शाळांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मागणी केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात भाजप (BJP) सरकार अपयशी ठरल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. संपूर्ण गोव्यात मोबाईल नेटवर्क प्रदान करण्यातही ते अयशस्वी ठरले आहे, त्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिकू शकले नाहीत. असे आमोणकर यांनी निदर्शनास आणून दिले.

तीन रेषीय प्रकल्पांविरोधात गोव्यातील (goa) जनतेने आवाज करूनही भाजप सरकारने ते रद्द करण्याबाबत एक शब्दही सांगितलेला नाही. एमपीटीचे क्रूझ टर्मिनल आणि ग्रीन कार्गो लॉजिस्टिक हबमध्ये रूपांतर करण्याची आणि फार्मा उत्पादनांच्या निर्यात मालासाठी एमपीटीचा वापर करण्याची घोषणा करण्यातही ते अपयशी ठरले. असे आमोणकर म्हणाले.

राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारची (Government) कोणतीही योजना नाही. गोवा कर्ज घेण्यावर पूर्णपणे अवलंबून आहे आणि अकार्यक्षमता लपवण्यासाठी ते जनतेला न मागितलेले भती देण्याचा प्रयत्न करत आहे. केवळ ट्रॅफिक चलन जारी करूनच नव्हे तर विविध माध्यमांतून महसूल मिळवून राज्याची तिजोरी मजबूत व्हावी, अशी जनतेची इच्छा आहे. असे आमोणकर यांनी सांगितले.

Sankalp Amonkar criticizes Chief Minister Pramod Sawant over budget
सुभाष फळदेसाईंची उपसभापती पदी निवड

आमोणकर म्हणाले की, भाजप सरकारने केलेल्या बेकायदेशीर नोकर भरतीमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा पडला आहे. कर्मचार्‍यांचे कौशल्य सुधारण्यात भाजप अपयशी ठरला आहे. मॉडेल व्हिलेज, इको-टुरिझम आणि इतर अनेक प्रकल्प मागील अर्थसंकल्पमधून वारंवार सादर केले जातात. गेली दहा वर्षे सत्तेत असूनही भाजप स्वत:चा जाहीरनामा राबवण्यात आणि गोव्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरला. असे आमोमकर म्हणाले.

या अर्थसंकल्पातील बराचसा मजकूर राज्यपालांच्या अभिभाषणातून घेतला असून, मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने कॉपी करून अर्थसंकल्पाचा (Governor) मसुदा तयार केल्याचे यावरून सिद्ध होते, असा आरोप आमोणकर यांनी केला. जुन्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे, मात्र नवीन प्रकल्पांसाठी काहीही बोलले गेलेले नाही.

डबल इंजिन सरकारकडून लोकांना नवीन गोष्टींची अपेक्षा होती. पण आता या सरकारकडे दूरदृष्टी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करण्यापूर्वी कोणत्याही भागधारकाला विश्वासात घेतले गेले नाही. सरकारने गोव्यातील लोकांच्या सूचना घेतल्या नाहीत आणि आपल्याला हवा तसा अर्थसंकल्प तयार केला आहे. हा टाईमपास अर्थसंकल्प गोव्याला प्रगती करण्यास मदत करणार नाही. भाजपने सामाजिक क्षेत्राकडे दुर्लक्ष केले आहे. अशी टीका देखील यावेळी बोलताना त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com