Sanjivani Sugar Factory: कारखान्‍याला ‘संजीवनी’ देण्‍यासाठी इथेनॉल प्रकल्प योग्‍यच : सावईकर

ऊस उत्‍पादकांच्‍या हिताला प्राधान्‍य
Adv.Narendra Sawaikar
Adv.Narendra SawaikarDainik Gomantak
Published on
Updated on

Sanjivani Sugar Factory Ethanol Project: संजीवनी साखर कारखान्‍याला ऊर्जितावस्था कशा प्रकारे मिळू शकते, यासंबंधीचा अहवाल सरकारला देण्यात आलाय. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी प्राथमिक स्तरावर काम केले.

आता हा प्रकल्प सुरू करायचा की नाही हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे, असे माजी खासदार तथा संजीवनी ऊसउत्पादक सुविधा समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.

संजीवनी ऊसउत्पादकांच्या बैठकीत सावईकर यांच्या सुविधा समितीच्या कामाबद्दल प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर त्‍यांनी आज फोंड्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यातील ऊसउत्पादकांना सहकार्याचा हात देण्यासाठी आणि संजीवनी साखर कारखान्याच्या हितासाठीच ऊसउत्पादक सुविधा समिती स्थापन करण्यात आली.

या समितीचा अध्यक्ष या नात्याने आपण वेळोवेळी सरकारच्‍या संपर्कात राहून ऊसउत्पादकांना पाच वर्षांचे आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी योजना आखली.

त्यातील तीन वर्षांचे आर्थिक साहाय्य ऊसउत्पादकांना देण्यात आले असून ही एकूण रक्कम २८ कोटी इतकी आहे, असे ते म्‍हणाले.

Adv.Narendra Sawaikar
Panaji Smart City: पणजीत ‘स्मार्ट’ रस्ते खचू लागले; विरोधकांची सरकारवर टीका

ऊस उत्‍पादकांच्‍या हिताला प्राधान्‍य

संजीवनीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी इथेनॉल प्रकल्प उभारणे योग्य असल्याचे मत नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केले. या प्रकल्पातून शेतकऱ्यांचे हित तर सांभाळले जाईलच शिवाय संजीवनीची आर्थिक स्थितीही सुधारेल.

संजीवनी सहकार खात्यातून कृषी खात्यात वर्ग केली, त्याचबरोबर संजीवनीवर नेमण्यात आलेला विद्यमान व यापूर्वीचा प्रशासक हा कृषी खात्याशी निगडित असल्याने संजीवनीच्या हितासाठी पूरक निर्णय घेणे शक्य झाले.

प्रकल्‍पासाठी दोन कंपन्‍यांची प्राथमिक पातळीवर निवड करण्‍यात आली आहे, असेही ते म्‍हणाले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com