Sanjay School Sada: गळके छत, लाईट, पाणीपुरवठा गैरसोय; सडा येथील विशेष मुलांची समस्यांच्या गर्तेत

शाळा इमारतीच्या सर्व तक्रारी लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन कुंकळकर व आमोणकर यांनी दिले.
Sanjay School Sada:
Sanjay School Sada:
Published on
Updated on

Sanjay School Sada: सडा - बोगदा येथील दुरावस्थेत पोचलेल्या संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन शाळेच्या इमारतीची संजय शाळेचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळकर तसेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी इतरांसह संयुक्त पाहणी केली व चिंता व्यक्त केली. सदर शाळा इमारतीच्या सर्व तक्रारी लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन कुंकळकर व आमोणकर यांनी दिले.

संजय स्कूल, बोगदा -मुरगावसाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 01 नोव्हेंबर 2014 रोजी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली होती. यावेळी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक हे होते. नंतर 2017 साली या इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर विशेष मुलांसाठी वर्ग सुरु करण्यात आले.

इमारतीला आताच सहा वर्षे झाली असून सदर इमारत समस्येच्या गर्तेत सापडली आहे. तीन मजलीच्या या इमारतीत गळती लागली आहे. सर्व वर्ग तसेच शौचालयात पावसाचे पाणी झिरपत असल्याने विशेष मुलांचे वर्ग घेण्यास अडचण निर्माण झाली आहे. तसेच पाणीपुरवठा, लाईट, छत आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी यांची दखल घेतली असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात सडा येथील संजय शाळेला भेडसावणा-या समस्यांचा पाढा वाचला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दखील याची दखल घेण्याचे आश्वासन दिले होते.

Sanjay School Sada:
वास्कोत 22 ऑगस्टला श्री दामोदर भजनी सप्ताह; साळकरांनी घेतला कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा

"विशेष विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि शाळेत होणारी गळती, पाणीपुरवठा, वीज, छत या समस्या प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे. त्यासाठी माझा प्रयत्न सुरू असून या समस्यांचे निवारण करण्यास सदैव तत्पर आहे." असे आमोणकर म्हणाले.

आज सकाळी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी संजय शाळेचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर व इतर संबंधीत अधिकाऱ्यां समवेत संजय शाळेच्या इमारतीची संयुक्त पाहणी केली व शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत संजय शाळेचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष कृष्णा केरकर, संजय शाळेच्या अतिरीक्त ताबा असलेल्या सदस्य सचिव नितल आमोणकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापीका सुलीन फर्नाडीस आदी उपस्थित होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com