फोन टॅपिंग फॉर्म्यूला गोव्यातही; दिगंबर कामत-संजय राऊत यांची भेट

मगोचे नेते सुदिन ढवळीकर तसेच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे देखील फोन होतात टॅपिंग; संजय राऊतांनी केला खुलासा
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोवा: राज्यात भाजप कडून काँग्रेसचे फोन टायपिंग होत असल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे यावर काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. दरम्यान, या मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपले मौन सोडले आहे. (Sanjay Raut Statment on goa Congress Phone Tapping Case)

Sanjay Raut
GCZMA टीमने पर्यावरणाच्या नुकसानीचा घेतला आढावा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले, "काही दिवसांपूर्वी मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते दिगंबर कामत भेटले दरम्यान त्यांनी गोव्यात काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचे मला सांगितले आणि चिंता व्यक्त केली." याबाबत काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आणि जनतेला माहिती दिली की काँग्रेसचे फोन टॅप होत असल्याची माहिती दिली.

ते पुढे म्हणाले "मी ह्याच्या पुढे जाऊन माहिती देतो की केवळ तुमचेच फोन टॅपिंग होत नाही तर मगोचे नेते सुदिन ढवळीकर तसेच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे देखील फोन टॅपिंग होत आहेत. 'गोव्यामध्ये शांतता फोन टॅपिंग' असं सध्या एक नाटक सुरू असून भाजपने राबवलेला हा महाराष्ट्र पॅटर्न आहे; महाराष्ट्रात पॅटर्नचे प्रमुख होते तेच गोव्याचे सध्या प्रमुख आहे त्यामुळे आम्ही सर्वजण काळजी घेत असल्याचे ते म्हणाले, दरम्यान भाजपकडून (BJP) सत्तेचा वारंवार गैरवापर होतोय सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही करा भाजप जिंकणार नाही हे आम्ही पहिल्यापासूनच आम्ही बोलत आलेलो आहे आणि तेच अंतिम सत्य असणार आहे.

संजय राऊत यांचे देखील होतात फोन टॅपिंग

दरम्यान,शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे देखील फोन टॅपिंग होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ते पुढे म्हणाले "हे मला माहीत असून सुद्धा मी माझा फोन नंबर बदललेला नाही, कारण मी असल्यांना घाबरत नाही." गोव्यात सध्या असलेले वातावरण महाराष्ट्रात मागील अनेक दिवसांपासुन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa SIR Guidelines
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com