Mapusa Market: म्हापसा व्यापारी संघटनेकडून नगराध्यक्षांना निवेदन; मार्केटमधील समस्यांवर वेधले लक्ष

यावेळी घरपट्टी वाढीला आक्षेप घेण्यात आला.
Mapusa Market issue
Mapusa Market issueDainik Gomantak

Mapusa Municipal Market Faces Issues : म्हापसा मार्केटमधील समस्यांवर पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी संघटनेकडून नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.

यावेळी घरपट्टी वाढीला आक्षेप घेण्यात आला. तसेच अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

म्हापसा मार्केट सध्या विविध समस्यांना तोंड देत आहे. म्हापसा मर्चंट्स असोसिएशनने (MMA) मार्केटशी संबंधित गंभीर समस्या सोडवण्यासाठी आज नगराध्यक्षांसोबत बैठक घेतली.

यावेळी समस्यांबद्दल असोसिएशनच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली तसेच यावर तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली.

Mapusa Market issue
'कंठ दाटला अन् डोळे भरून आले' खासदार विनय तेंडुलकरांना राज्यसभेतून निरोप

यावेळी मार्केटमधील काही समस्यांवर पालिकेचे लक्ष वेधले ते मुद्दे पुढीलप्रमाणे,

म्हापसा मार्केटमध्ये विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. विक्रेते त्यांना आखून दिलेल्या जागेच्या बाहेर व्यवसाय करीत असून दुकानदारांच्या प्रवेशद्वारावर अडथळा निर्माण करीत आहेत.

मुख्य प्रवेशद्वारासह मार्केटमधील सर्व गेटवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे.

बाजारपेठेत पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा नसते. आगीच्या घटनांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांसारख्या आपत्कालीन वाहनांना मार्केटमध्ये येण्यासाठी अडचणी येतात. विक्रेते रात्रीच्या वेळी त्यांचा माल रस्त्यावर सोडत आहेत.

टाउन व्हेंडिंग कमिटी (TVC) स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच मार्केटमधील शौचालयांची स्थिती दयनीय आहे. तसेच मार्केटमधील रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. मार्केटमध्ये सीसीटीव्ही व स्ट्रीट लाईटचाही अभाव आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com