Sanguem: जुन्‍या पुलावर टँकर अडकताच नव्‍या पुलाचे 'धाडसी उद्‌घाटन', वाहतूक कोंडीमुळे चालकांचा सुटला संयम; सांगेतील प्रकार

sanguem bridge incident: बेंडवाडा-सांगे येथील जुन्या पुलावरून काँक्रीट वाहतूक करणारा एक टँकर बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मध्यभागीच बंद पडल्‍याने वाहतुकीचा खोळंबा उडाला.
Sanguem
SanguemDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: बेंडवाडा-सांगे येथील जुन्या पुलावरून काँक्रीट वाहतूक करणारा एक टँकर बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मध्यभागीच बंद पडल्‍याने वाहतुकीचा खोळंबा उडाला. टँकरचे इंजीन अचानक बंद पडताच पुलावर अडकलेल्या वाहनांनी अक्षरशः कोंडीचे रूप घेतले.

टँकर चालकाने वारंवार ‘क्रॅंक’ मारून इंजीन ‘जागे’ करण्याचा प्रयत्न केला. परंतु टँकर जागचा हलत नव्हता. वाहने रांगेत उभी, चालकांच्या चेहऱ्यावर चिडचिड, प्रवाशांचा उडालेला गोंधळ. अखेर वाहनचालकांनी एकच निर्णय घेतला, जुना पूल बंद तर सरळ नवीन पुलावरूनच मार्ग काढू. वाहतुकीच्‍या कोंडीवर उपाय म्‍हणून असंख्‍य वाहनचालकांनी पुढाकार घेत नव्या पुलावरून पर्यायी वाहतूक सुरू केली. कोणतीही घोषणा, कोणताही इशारा न देता वाहनांची ताफे नव्या पुलावरून सरकू लागले.

Sanguem
Goa Politics: 'गोव्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही!', अमित पाटकरांनी दिवसाढवळ्या हल्ले, दरोडे आणि खुनांच्या घटनांवरुन सावंत सरकारवर केला हल्लाबोल

नवीन पूल वाहतुकीसाठी अद्याप अधिकृतपणे खुला झालेला नाही. दोन्ही बाजूंनी रस्त्याची बांधणीही पूर्ण झालेली नाही. तरीही गरज ओळखून प्रवासी बसेस, चारचाकी, दुचाकी, मालवाहू वाहनांनी थेट नव्या पुलाकडे आपला मोर्चा वळविला. पुलाचे उद्‌घाटन कधी होणार याची वाट न पाहता, त्या पुलाने पहिली ‘अनौपचारिक चाचणी’ पार केली असेच म्हणावे लागेल.

Sanguem
Goa Taxi Issue: आता मडगाव-काणकोण टॅक्सीचालकांमध्‍ये संघर्ष, प्रकरण थेट पोलिसांत; एकमेकांची टॅक्‍सी रोखली

आज टँकर, उद्या काय? : लोक संतप्‍त

जुन्या पुलावर बंद पडलेल्‍या टँकरमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा संयम तुटला. ‘काम पूर्ण कधी करणार?’, ‘पूल तयार आहे की नाही?’ अशा प्रश्‍‍नांचा भडिमार त्‍यांनी केला.

या घटनेनंतर नागरिक तसेच वाहनचालकांनी नवीन पूल तातडीने पूर्ण करून अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्‍याची मागणी केली. आज टँकर अडकला, उद्या काय? असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com