Sanguem Town Hall: सांगे पालिकेची मोहीम अर्धवट! ‘टाऊन हॉल’ पाडण्यास न्यायालयाची स्थगिती; विक्रेत्यांकडून जोरदार विरोध

Sanguem Municipal Council: ‘टाऊन हॉल’ ही सांगे मामलेदार कार्यालयासमोर असलेली पन्नास वर्षीय जुनी वास्तू आहे. त्या जुन्या वास्तूचा काही भाग याआधी कोसळून पडला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून पालिका ही वास्तू मोडण्यासाठी प्रयत्न करीत होती.
Sanguem Town Hall Demolition
Sanguem Town Hall Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanguem Town Hall Demolition Stay Order

सांगे: सांगेतील पन्नास वर्षीय जुना टाऊन हॉल जमीनदोस्त करण्यासाठी सांगे पालिकेने तयारी केली होती; पण अखेरच्या क्षणी टाऊन हॉलखाली चिकन-मटणचा व्यवसाय करणाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पालिकेच्या आदेशाला अंतरिम स्थगिती मिळविल्याने सांगे पालिकेला माघारी फिरावे लागले.

दरम्यान, या स्थगिती आदेशावर तीन दिवसांत सुनावणी होणार आहे. ‘टाऊन हॉल’ ही सांगे मामलेदार कार्यालयासमोर असलेली पन्नास वर्षीय जुनी वास्तू आहे. त्या जुन्या वास्तूचा काही भाग याआधी कोसळून पडला आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून पालिका ही वास्तू मोडण्यासाठी प्रयत्न करीत होती. दरम्यान, पालिकेने या टाऊन हॉलखाली चिकन व मटण विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली होती.

तसेच यापूर्वी मासळी, भाजी, फळ विक्री येथे होत असे. कालांतराने पालिकेने सर्व व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी हलविले; पण चिकन आणि मटण विक्री करणाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय इतर ठिकाणी जाणार नसल्याचे पालिकेला सांगितले होते. यावेळी कारवाईसाठी सांगे पालिकेने तयारी केली होती; पण चिकन-मटण विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पालिकेच्या आदेशाला स्थगिती मिळविल्याने पालिकेला माघारी फिरावे लागले.

यावेळी कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप, मामलेदार तथा पालिकाधिकारी सागर प्रभू, पोलिस निरीक्षक प्रवीण गावस, पालिका मंडळ, पालिका अभियंता, कर्मचारी उपस्थित होते. चिकन-मटण व्यापाऱ्यांना तेथून हलविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटाही ठेवला होता. मात्र, उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याचा आदेश आल्याने मोहीम अर्धवट राहिली.

विक्रेत्यांकडून ५० मीटर जागेची मागणी

चिकन-मटण विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, आता मासळी मार्केट आहे त्या ठिकाणी पूर्वी महंमद अली यांचे घर होते. ते घर हटवून नंतर मासळी मार्केट बांधण्यात आले. त्यावेळी पालिकेने महंमद अली यांना लेखी करारानुसार जागा उपलब्ध करून देण्याचे लिहून दिले होते. तसेच पन्नास मीटर जागा असलेली दुकाने देणे क्रमप्राप्त असून आता पालिका दहा मीटर जागेवर तुमच्या लोकांनी सही केल्याची कागदपत्रे दाखवत आहे.

Sanguem Town Hall Demolition
Cash For Job: 1 कोटी 20 लाखांची फसवणूक? 'Cash For Job Scam' प्रकरणात ढवळीतील शिक्षकाला अटक

पालिकेच्या म्हणण्यानुसार, चिकन-मटण विक्रेत्यांनी दहा मीटर दुकानाची जागा देण्याच्या करारावर सही केल्याचे मान्य केले होते. दरम्यान, चिकन-मटण विक्रेते आम्हाला न्याय द्या, अशी मागणी करत आहेत. जोपर्यंत पन्नास मीटर जागा उपलब्ध करून देत नाहीत, तोपर्यंत टाऊन हॉलखाली घातलेली चिकन व मटण विक्रीची दुकाने खाली करणार नाही, असे ते सांगत आहेत.

कायदा-सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून मी आज उपस्थित होतो; पण या कारवाईदरम्यान उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे आजची कारवाई पुढे गेली असली तरी दोन्ही बाजूने योग्य तोडगा काढणार आहोत. सांगे पालिकेने या स्थगिती आदेशाला तोंड देण्यासाठी उद्या तातडीची बैठक बोलविली असून त्यात पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.

मिलिंद्र वेळीप, उपजिल्हाधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com