सांगे पालिकेची बैठक ठरली वादळी, तसबिरीवरून आमदार-नगरसेवक यांच्‍यात जुंपली

Sanguem Municipal Council Meeting Clash: सांगे पालिकेची आर्थिक वर्षातील शेवटची बैठक तसबिरीच्या मुद्यावरून वादळी ठरली.
Sanguem Municipal Council Meeting Clash
Sanguem Municipal Council Meeting ClashDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे: सांगे पालिकेची आर्थिक वर्षातील शेवटची बैठक तसबिरीच्या मुद्यावरून वादळी ठरली. आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि नगरसेवक मेशू डिकॉस्‍टा यांच्यात जॅक सिक्वेरा यांच्या तसबिरीवरून शाब्दिक चकमक उडाली.

पालिकेच्या इमारतीत जॅक सिक्वेरा यांची तसबीर कोणतीही पूर्वकल्पना न देता लावण्यात आल्याचा आक्षेप मंत्री फळदेसाई यांनी घेतला. यावर मेशू डिकॉस्‍टा यांनी तसबीर लावण्यासाठी पूर्वीच ठराव मंजूर करण्‍यात आल्‍याचा दावा केला. मात्र, चार तसबिरींचा ठराव असताना एकच तसबीर का लावली? असा सवाल फळदेसाई यांनी उपस्थित केला.

Sanguem Municipal Council Meeting Clash
Goa Weather Update: पुढील 48 तास महत्त्वाचे! गोव्यात पावसाच्या सरी बरसणार; उन्हाच्या तडाख्यानंतर मिळणार गारवा

यावेळी मेशू डिकॉस्‍टा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा संदर्भ देत ठरावाशिवायही पुतळा उभारला गेला होता, असे नमूद केले. पालिका सभागृहात जॅक सिक्‍वेरा, शाबू देसाई, बिरसा मुंडा आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा एकूण चार तसबिरी बसविण्याचा ठराव घेण्यात आला होता.

उर्वरित तसबिरी स्वतःच्या खर्चातून लावण्याची तयारी डिकॉस्‍टा यांनी दर्शवली. दरम्‍यान, पालिकेच्या बाजूने मात्र सर्व तसबिरी पालिका निधीतूनच लावण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच डिकॉस्‍टा यांनी लावलेल्या तसबिरीचा खर्चही परत करण्याची तयारी दर्शविण्यात आली.

Sanguem Municipal Council Meeting Clash
Goa Crime: गिरी येथील महिलेची 2.23 लाखांची फसवणूक; साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराज, जॅक सिक्‍वेरा, शाबू देसाई आणि बिरसा मुंडा अशा चार तसबिरी पालिका सभागृहात लावण्याचा ठराव पालिकेने घेतला होता. पण मेशू डिकॉस्‍टा यांनी एकच तसबीर लावताना कोणालाही विश्‍‍वासात घेतलेले नाही. तसेच त्‍यांनी त्‍या तसबिरीवर लिहिलेला संदेशही योग्‍य नव्‍हता. तो पुसून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राहिलेल्या तीन तसबिरी पालिका स्‍वत:च्‍या खर्चातून बसविणार आहे. मेशू डिकॉस्‍टा यांनी लावलेल्या तसबिरीचा खर्च पालिका त्‍यांना परत करण्यास तयार आहे.

- संतीक्षा गडकर, नगराध्यक्ष (सांगे)

वादाचे कारण काय?

नगरपालिका इमारतीत जॅक सिक्वेरा यांची तसबीर अचानक लावल्याचा आरोप.

चार तसबिरींच्या ठराव, पण एकच लावल्‍याने मतभेद. तसबिरीवरील संदेशालाही आक्षेप.

खर्च आणि निर्णय

तसबिरीसाठी सुमारे ३३ हजार रुपये खर्च

तसबीर दीर्घकाळ किमान ८० वर्षे टिकणारी असल्याचा दावा

उर्वरित तसबिरी पालिका स्‍वत:च्‍या खर्चातून बसविणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com