Cumbarjua Sangodd Utsav: कुंभारजुवे येथे सांगोड बुडाल्याने एकच गोंधळ! प्रसंगावधानामुळे भाविक बचावले

Sangodd Utsav 2024: कुंभारजुवेत सांगोडोत्सवावेळी एक सांगोड पाण्यात बुडाल्याने बोटीवरील लोकांची तारांबळ उडाली
Sangodd Utsav 2024: कुंभारजुवेत सांगोडोत्सवावेळी एक सांगोड पाण्यात बुडाल्याने बोटीवरील लोकांची तारांबळ उडाली
Sangodd Festival 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sangodd Festival 2024

तिसवाडी: कुंभारजुवेतील नदीत श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानतर्फे साजरा केला जाणाऱ्या सांगोडोत्सवावेळी एक सांगोड पाण्यात बुडाल्याने बोटीवरील लोकांची तारांबळ उडाली. होड्यांवरील सुमारे १५ जण नदीच्या पाण्यात पडल्याने एकच गोंधळ उडाला; परंतु वेळीच इतरांनी मदतीचा हात दिल्याने मोठी दुर्घटना टळली. सांगोडोत्सवाला दुर्घटनेचे गालबोट होण्यापासून देवीच्या चमत्काराने रोखले, अशी प्रतिक्रिया भाविकांनी यावेळी व्यक्त केली.

या सांगोडोत्सवात दोन होड्यांना एकत्रित करून तयार केलेला सांगोड घेऊन फेऱ्या मारत असताना शेवटच्या क्षणी नदीकाठी जात असतानाच एक सांगोड बुडाला. त्या सांगोडवरील काहीजण प्रसाद घेण्यासाठी दुसऱ्या बाजूला गेल्याने एका बाजूचे वजन वाढून समतोल सुटला आणि सांगोड बुडाला.

या सांगोडवर श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट हेदेखील होते. त्यांच्यासोबत काही युवक, मध्यमवयीन आणि वृद्ध मंडळीही तेथे होती. सांगोड पाण्यात बुडाल्यानंतर काही काळ एकच गोंधळ उडाला. त्यातील काही युवक आणि मध्यमवयीन लोक पोहून सुखरूप दुसऱ्या सांगोडांवर गेले. गोंधळलेल्या अवस्थेतील काही वृद्ध नदीत बुडण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रसंगावधान राखून इतरांनी मदतीचा हात देऊन त्यांना सुखरूप बाहेर काढले.

डॉ. शिवाजी शेट यांनी या घटनेनंतर पत्रकारांशी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, एका बाजूला वजन वाढल्यामुळे ही घटना घडली; परंतु वेळीच सर्वांना बाहेर काढण्यात आले. या कठीण प्रसंगात आम्हाला देवीचा आशीर्वादच लाभला; कारण सगळ्यांनी लगेच मदतीसाठी धाव घेतली. आणखी काही वेळ गेला असता तर काहीही झाले असते. मात्र, देवी आमच्या पाठीशी असल्याचे आज सिद्ध झाले.

एकमेकांना वाचविले

आमदार राजेश फळदेसाई हे या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याने ते भावूक झाले. माझ्या डोळ्यांसमोरच ही सर्व घटना घडली. यावेळी त्यांना सर्वांचे कौतुक वाटले. कारण त्यांनी धाव घेऊन अडचणीत असलेल्यांचे वेळीच प्राण वाचवले. एकाच वेळी सुमारे १५ जण नदीच्या पाण्यात पडल्याने घबराट निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, सर्वांनी प्रसंगावधान राखून एकमेकांना वाचविले. अशा कठीण प्रसंगी देवीच पावली, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

Sangodd Utsav 2024: कुंभारजुवेत सांगोडोत्सवावेळी एक सांगोड पाण्यात बुडाल्याने बोटीवरील लोकांची तारांबळ उडाली
Sangodd Festival 2024: देवते पाव गे! गणपती विसर्जनाच्या दिवशी रंगणाऱ्या 'सांगोडोत्सव'विषयी माहितीये का?

लाकडी होड्यांची समस्या

गेल्या ३५० वर्षांपासून येथील पारंपरिक सांगोडोत्सव लाकडी होड्यांवर साजरा केला जात आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून फायबरच्या होड्या बनविल्या जात आहेत. मात्र, देवीच्या कौलाप्रमाणे लाकडी होडीच वापरावी, असे सांगण्यात आल्याने यंदा काही लहान लाकडी होड्या वापरून उत्सव साजरा करण्यात आला. होड्या लहान असल्याने त्यावर समतोल राखून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र, समतोल बिघडल्याने ही घटना घडली, असे सांगण्यात आले.

सांगोडोत्सवात लाकडी होड्या वापरल्या जातात. मात्र, यंदा सांगोडोत्सवात लहान होड्या होत्या. त्यात शेवटच्या क्षणी ही घटना घडली; परंतु दैवी शक्तीचा चमत्कार आज आम्हाला पाहायला मिळाला. ३५० वर्षांत पहिल्यांदाच अशी घटना घडली. मात्र, श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

राजेश फळदेसाई, आमदार, कुंभारजुवे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com