

मडगाव : महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील एका द्राक्षे व्यापाऱ्याकडे तब्बल ३६ लाख ५० हजार रोकड सापडली. करमळी रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या त्याला आयकर खात्याने आपल्या ताब्यात घेतले आहे.
२१ रोजी करमली रेल्वे स्थानकावर तो केरळ येथे जाणाऱ्या रेल्वेच्या प्रतिक्षेत उभा असताना, गस्तीवरील पोलिसांनी त्याला हटकले असता तो पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. पोलिसांचा संशय बळविल्यानंतर त्याला मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर आणून ४१ कलमाखाली त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
अवधूत तानाजी भोसले (२९) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडील बॅगेत रोकड मिळाली. पोलिसांनी खोदून खोदून विचारले तरी सुरवातीला त्याने दाद दिली नाही. नंतर त्याने केरळ राज्यात आपण घर बांधत असून त्या कामासाठी कंत्राटदाराला ही रक्कम पोच करण्यासाठी आपण जात असल्याचे सांगितले होते.
त्या कंत्राटदाराने रोकडेने व्यवहार करण्यास सांगितल्याने आपण ही रक्कम घेऊन जात असल्याचे त्याचे म्हणणे होते. रोकड विषयी तो कुठलेही कागदपत्रे पोलिसांना सादर करू शकला नसल्याने नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, त्याच्या वकिलाने पोलिसांसमोर सर्व कायदेशीर कागदपत्रे सादर केली. खबरदारी म्हणून या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईसाठी इडी व आयकर विभागांनाही कळविले होते. बुधवारी त्याला उपदंडाधिकाऱ्यासमोर पोलिसांनी हजर केले असता, त्याला जामीन देण्यात आला होता. मात्र त्याच्याकडे सापडलेल्या रोकड व आर्थिक स्रोत विषयी तपासासाठी त्याला आयकर विभागाने नंतर आपल्या ताब्यात घेतले. पुढील तपास चालू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.