Ganesh Chaturthi 2023: संगमपूर गणेशोत्सव मंडळाचे यंदा 60वे वर्ष

दहा दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
Ganesh Chaturthi Decoration Idea
Ganesh Chaturthi Decoration IdeaDainik Gomantak

संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा साठावे वर्ष साजरे करीत असून मंगळवार ता.१९ ते गुरुवार ता.२८ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी )अशा दहा दिवसांसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी संध्याकाळी ४ वा. श्रींचे बॅंड वादनासह भव्य आगमन, श्रींचे पूजन, आरत्या तीर्थ प्रसाद होईल.

दुसऱ्या दिवशी बुधवार ता.२० रोजी सकाळी ८ वाजता नित्य पूजा, दुपारी १२ वा. व संद्याकाळी ७ वाजता आरत्या व तीर्थ प्रसाद.

तिसरा दिवस गुरुवार ता.२१ रोजी सकाळी, दुपारी, संध्याकाळी नित्य पूजा, आरत्या तीर्थ प्रसाद व संध्याकाळी ४ वा. हभप. शुभला कलंगुटकर, आकांशा प्रभू व शिवानी वझे यांचे कीर्तन व ७.३० वाजता प्रेमानंद पाटील यांचा जादूचा कार्यक्रम होणार आहे.

दिवस चौथा शुक्रवार ता.२२ सप्टेंबर रोजी सकाळी, दुपारी नित्य पूजा आरत्या प्रसाद. ३ वा.सांगे मर्यादित घुमट आरती स्पर्धा, त्या नंतर अखिल गोवा मर्यादित घुमट आरती स्पर्धा होणार आहे.

Ganesh Chaturthi Decoration Idea
IRB तुकड्या, दहशतवाद विरोधी पथकासह गोव्यात गणेशोत्सवासाठी 3,000 पोलीस तैनात

दिवस पाचवा शनिवार ता. २३ रोजी नित्यपूजा आरती तीर्थ प्रसाद. संध्याकाळी स्थानिक कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम. संध्याकाळी ५ वा. अखिल गोवा मर्यादित हिंदी कराओके गीत गायन स्पर्धा.

दिवस आठवा ता.२६ रोजी सकाळी नित्य पूजा आरती. सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, होम, हवन, आरत्या, तीर्थ प्रसाद. दुपारी ३ वा. हायस्कूल मर्यादित निमंत्रितांचा ‘वंदे मातरम’ कार्यक्रम. रात्री ८ वा. ‘आला ग सुगंध मातीचा’ हा भाव गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

नववा दिवस ता. २७ रोजी सकाळी पूजा, सकाळी १० वा.रंगपूजा, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायं. ४ वा. सरकारी प्राथमिक विद्यालय, युनियन हायस्कूल, शिशू वाटिका सांगे यांचा सांस्कृतिक कार्यक्रम. रात्री ९ वा. वैभवी क्रिएशन, डिचोली निर्मित नाटक ‘हॅलो ब्रदर’ सादर करण्यात येईल.

दहावा दिवस ता.२८ रोजी सकाळी नित्य पूजा, ३ वा. फळा फुलांची पावणी, संध्याकाळी ४ वाजता यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान. ज्येष्ठ सदस्यांचा सन्मान, सोडत निकाल त्या नंतर आकर्षक आतषबाजी होईल. नंतर श्रींची आकर्षक मयूर रथातून बेंजो, बॅंडसह विसर्जन मिरवणूक संगमेश्वर तीरी प्रयाण करेल. कार्यक्रमात बदल होऊ शकतो, असेही कळवले आहे.

रविवारी ‘शुभ टिंगल सावधान’

दिवस सहावा रविवार ता २४ सप्टेंबर रोजी नित्य पूजा, आरती संध्याकाळी ४ वा. होडर कुडचडे तर्फे भजनाचा कार्यक्रम, संध्याकाळी ७.३० वा. कला चेतना वळवई, राजदीप नाईक निर्मित ‘शुभ टिंगल सावधान’ हा कोकणी नाट्यप्रयोग होणार आहे.

दिवस सातवा सोमवार ता.२५ सप्टेंबर रोजी नित्य पूजा आरती. संध्याकाळी ४ वा. नुपूर डान्स अकादमी प्रस्तुत ‘नृत्यांजली’ कार्यक्रम होईल.रात्री८ वाजता सत्यवान नाईक प्रस्तुत ऑर्केस्ट्रा ओंकार मॅलोडीज होणार आहे.

Ganesh Chaturthi Decoration Idea
Goa Police: दक्षिण गोव्यात 46 सराईत गुन्हेगार आले पोलिसांच्या रडारवर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com