Kajumal Mollem: रातोरात रेतीचे ढिगारे गायब! काजूमळ-मोले येथील घटना; बातमीनंतर पोलीस बंदोबस्त मात्र कारवाई नाहीच

Kajumal Mollem Sand Theft: काजूमळ - मोले येथे बेकायदेशीररित्या रेती उपसा करण्यात येत असल्याचे वृत्त दैनिक गोमन्तक तसेच व गोमन्तक टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध झाल्यानंतर रेती व्यवसायात गुंतलेल्या माफियाची तारांबळ उडाली आहे. बुधवारी काढण्यात आलेले रेतीचे दोन ढिगारे रातोरात गायब झाले आहेत.
Kajumal Mollem Sand Theft
Kajumal Mollem Sand Theft Dainik Gomantak
Published on
Updated on

Kajumal Mollem Sand Theft

फोंडा: काजूमळ - मोले येथे बेकायदेशीररित्या रेती उपसा करण्यात येत असल्याचे वृत्त दैनिक गोमन्तक तसेच व गोमन्तक टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध झाल्यानंतर रेती व्यवसायात गुंतलेल्या माफियाची तारांबळ उडाली आहे. बुधवारी काढण्यात आलेले रेतीचे दोन ढिगारे रातोरात गायब झाले आहेत.

मात्र, ही रेती कुणी गायब केली? रेती गायब करण्यासाठी कुणा राजकीय व्यक्तीचे सहकार्य मिळाले का, हे एक कोडेच आहे. दिवसाढवळ्या तिथे पोलिस पहारा असल्याने ही रेती रात्री गायब केल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काजूमळ भागात दूधसागर नदीतील रेती उपसा करण्यासाठी माफियांनी खास परप्रांतीय कामगारांना पाचारण केले होते. शुक्रवारी सकाळी मामलेदार प्रतापराव नाईक देसाई, तलाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. शनिवारी या परिसरात पोलिस तैनात केले. पत्रकारांनी शनिवारी पुन्हा या परिसराची पाहणी केली असता, नदीच्या काठावरील रेतीचे मोठे दोन ढिगारे गायब झाल्याचे दिसून आले. सध्या सुमारे ४-५ ट्रक रेती तशीच पडून आहे.

Kajumal Mollem Sand Theft
Goa Education: डीएड अभ्यासक्रम बंद होणार! शिक्षण विभागाने सांगितले 'हे' कारण; राज्य घेणार 'एनसीईआरटी’चे मार्गदर्शन

बंदोबस्त ठेवला, कारवाईचे काय?

बेकायदा रेती उपशासंदर्भात गुरुवारी दैनिक ‘गोमन्तक’मध्ये वृत्त प्रसिद्ध होऊनही अजूनपर्यंत कुळे पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला नसल्याने लोकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शनिवारी रेती उपसा केल्या जाणाऱ्या ठिकाणी एक पोलिस आणि एक होमगार्ड नेमल्याचे दिसून आले.

Kajumal Mollem Sand Theft
Mandrem Crime: राजकीय विषय नाहीच! माजी सरपंच हल्लाप्रकरण उलगडले, 'जमीन विक्री' व्यवहाराची पार्श्वभूमी

गुन्हे न नोंदवताच कामगारांना सोडले

गुरुवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर धारबांदोडा येथील एका अधिकाऱ्याने पोलिसांना त्या ठिकाणी जाऊन रेती उपसा बंद करा, असे सांगितले होते. या आदेशाचे पालन करण्यासाठी कुळे पोलिस त्या ठिकाणी गेले, तेव्हा तेथे परप्रांतीय कामगार नदीत रेती उपसा करताना दिसले. त्यांना पोलिस स्थानकात आणले. मात्र, तेव्हाच कुणाचा तरी फोन आला आणि गुन्हा नोंद न करताच त्या कामगारांना सोडून दिल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com