सिंदोळी-सांकवाळातील झरे, नाले, विहिरींत इंधन आले कुठून? अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च परिसरात गूढ कायम; पुन्हा तपासणी होण्याची शक्यता

Sancoale Fuel Contamination: सिंदोळी-सांकवाळ येथील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च परिसरातील विहिरीतील पाण्यात इंधन कोठून मिसळले याचा स्त्रोत अद्याप स्पष्ट होऊ शकला नाही.
Sancoale Fuel Contamination
Sancoale Fuel ContaminationDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: सिंदोळी-सांकवाळ येथील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च परिसरातील विहिरीतील पाण्यात इंधन कोठून मिसळले याचा स्त्रोत अद्याप स्पष्ट होऊ शकला नाही. या परिसरातील इतर विहिंरींची व झरे, नाल्यांची तपासणी करण्यात आली. तथापि त्यात इंधनाचा अंश सापडला नाही. त्यामुळे चर्च परिसरातील विहिरीत इंधन कोठून आले हे गूढ कायम आहे.

चर्चच्या वरच्या भागातील महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंप व सभोवतीची उद्या (बुधवारी) तपासणी होण्याची शक्यता आहे.

पोलिस तपासाचा एक भाग म्हणून चर्च परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक गुरुदास कदम यांनी सांगितले.तर त्या इंधनाचा स्त्रोत लवकरात लवकर शोधणे लक्ष्य असल्याचे कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी सांगितले.

Sancoale Fuel Contamination
Goa Weather: थंडीने पल्लवित केलेल्‍या आशा उष्‍म्‍याने मावळल्‍या! काजू, आंबा बागायतदारांची व्‍यथा; दुसरा मोहोर करपला

जलस्त्रोत विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभागाच्या अधिकारयांनी तेथे भेट देऊन पाण्याचे नमुने गोळा केल्याचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमली यांनी सांगितले. जलस्त्रोत, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभागाच्या अधिकारयांनी त्या परिसरातील इतर विहिरींची, झरयांच्या पाण्याची तपासणी केली.

तेव्हा त्या पाण्यात काही आढळले नाही. तथापि पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोग शाळेत नेण्यात आले आहेत. मंगळवारी पुन्हा त्या विहिरीतील पाणीमिश्रित इंधन सायंकाळपर्यंत पंपद्वारे ते पाणी ३ पिंपात काढण्यात आले.

परिसरातील रहिवाशांत भीती

विहिरीतील इंधनमिश्रित पाणी बाहेर काढण्याचे काम मंगळवारी सुरू करण्यात आल्यावर सहा पिंपामध्ये सदर इंधनमिश्रित पाणी जमा करण्यात आले आहे. सिंदोळी-सांकवाळ येथील चर्च परिसरातील विहिरीतील पाण्यामध्ये इंधन मिसळल्याने आसपासच्या रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. यासंबंधी आमदार वाझ यांनी दखल घेऊन सोमवारी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानुसार सोमवारी (ता.३०) संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासमावेत आमदार वाझ यांनी बैठक घेतली.

Sancoale Fuel Contamination
Goa Tourism: गोव्यातला 'स्वर्ग...'! शॉपिंग, बीच शॅक्स अन् अथांग सागराचं लावण्य अनुभवायचयं; 'हा' समुद्रकिनारा तुमच्यासाठी बेस्ट

इंधन कंपनीने फेटाळली गळती

चर्चच्या वरच्या भागात दोन पेट्रोल पंप आहेत, त्या पेट्रोल पंपातील टाक्यांना गळती लागून इंधन जमिनीत झिरपून ते या विहिरीपर्यंत पोहचले की काय यासंबंघी तपासणी करण्यात येईल. दरम्यान, इंधन कंपनीचे एक अधिकारी श्रीप्रसाद नाईक यांनी सदर इंधन टाक्यातून झाल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. या भागात आमची इंधन वाहिनी नाही. शिवाय कंपनीच्या टाक्या दूरवर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com