Sancoale: सांकवाळमध्ये गुदिन्होंना धक्का, पंचायतीत अकस्मात खांदेपालट; सरपंच, उपसरपंचांची माघार; ग्रामसेवकही बदलले

Sancoale Panchayat Resignation: सांकवाळच्या सरपंच अनुषा लमाणी आणि उपसरपंच डेरेक वालीस यांच्या विरोधात सहा पंचसदस्यांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर त्या दोघांनीही राजीनामा दिला
Sancoale Panchayat Resignation
Sancoale Panchayat ResignationDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सांकवाळच्या सरपंच अनुषा लमाणी आणि उपसरपंच डेरेक वालीस यांच्या विरोधात सहा पंचसदस्यांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर त्या दोघांनीही राजीनामा दिला असून हा धक्का फक्त सरपंच आणि उपसरपंच यांनाच नसून या पंचायतीवर पूर्ण कब्जा केलेले वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या वर्चस्वाला बसलेला हा मोठा धक्का आहे.

या अविश्वास ठराव प्रस्तावामागे या पंचायत क्षेत्रात येणाऱ्या मेगा प्रकल्पाचे राजकारण असून विद्यमान सरपंच आणि उपसरपंच या प्रकल्पाबद्दल निर्णय घेताना सत्ताधारी गटातील इतर पंचसदस्यांना विश्वासात घेत नसल्यामुळेच सत्ताधारी गटातील पाच पंचसदस्यांनी बंडाचा पवित्रा घेतला, असे सांगितले जाते.

Sancoale Panchayat Resignation
Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

सांकवाळ ही गोव्यातील काही श्रीमंत पंचायतींपैकी एक असून यापूर्वी सत्ताधारी गटात ९ सदस्यांचे संख्याबळ होते. या पंचायतीवर मंत्री माविन गुदिन्हो यांचे पूर्ण वर्चस्व होते. उपसरपंच वालीस हे गुदिन्हो यांच्या मर्जीतील सदस्य होते. तर भाजपचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष तुळशीदास नाईक हे विरोधात होते आणि त्यांना फक्त अन्य एका सदस्याचा पाठिंबा होता.

मात्र, या पंचायतीने भूतानी प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर जो जनक्षोभ उसळला, त्यानंतर या पंचायतीतील समतोल बिघडण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. भूतानी प्रकल्पानंतर या पंचायतीकडे येणाऱ्या फाईल्स सरपंच आणि उपसरपंच सत्ताधारी गटातील अन्य कुणालाही विश्वासात न घेता हाताळू लागल्यानेच सत्ताधारी गटात फूट पडली आणि पर्यायाने गुदिन्हो यांच्या वर्चस्वालाही त्यामुळे तडा गेला.

साडेतीन वर्षांनंतर ग्रामसचिवाची नेमणूक

सांकवाळ पंचायतीवर सुमारे साडेतीन वर्षानंतर अखेर ग्रामसचिवाची नेमणूक करण्यात आली. गेली साडेतीन वर्षे पंचायतीचा कारभार ग्रामसेवक चालवित होते. आता सांकवाळ पंचायतीवर ग्रामसचिव योगेश फातर्पेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sancoale Panchayat Resignation
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

आतील राजकारण वेगळेच

सरपंच व उपसरपंचांविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावर सही करण्यात माजी सरपंच रोहिणी तोरस्कर यांचा समावेश असल्याने हा गुदिन्होंच्या विरोधात दिलेला कौल असे मानले जात असून तुळशीदास नाईक यांचा अपवाद वगळता या ठरावावर सह्या करणारे पाच सदस्य हे पूर्वी सत्ताधारी गटात सदस्य असल्याने या ठरावाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com