Sancoale News: ..अहवाल तातडीने द्या! सांकवाळ सांडपाणी प्रश्नावरुन आमदार वाझ ॲक्शन मोडवर

Sancoale News: झुआरीनगर-वास्‍को येथे असलेल्या सांकवाळ पंचायतीच्या सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा केंद्र तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्‍पात कचऱ्याच्‍या राशी आढळून आल्‍या आहेत
Sancoale News: झुआरीनगर-वास्‍को येथे असलेल्या सांकवाळ पंचायतीच्या सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा केंद्र तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्‍पात कचऱ्याच्‍या राशी आढळून आल्‍या आहेत
Vasco Zuarinagar | MLA Antonio VazDainik Gomantak
Published on
Updated on

Sancoale Sewage Waste Issue

वास्को: झुआरीनगर-वास्‍को येथे असलेल्या सांकवाळ पंचायतीच्या सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा केंद्र तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्‍पात कचऱ्याच्‍या राशी आढळून आल्‍या आहेत. तेथून दहा मीटर अंतरावर असलेल्या नाल्यातून दूषित व दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याने पाहणी करण्यात आली. या सांडपाण्यामुळे आसपासच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

सदर सांडपाणी नाल्यातून तलावात नंतर झुआरी नदीत जाते. यासंबंधीचा अहवाल आपल्या कार्यालयात तात्काळ पाठवा, असे निर्देश आमदार आंतोनियो वाझ यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (Goa State Pollution Control Board) दिले आहेत.

सांकवाळचा बांदोळे तलाव तसेच आसपासच्या नाल्यांतील पाणी प्रदूषित झालेले आहे. या प्रकरणाची दखल कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ यांनी घेतली.

सांकवाळ पंचायतीच्या सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा केंद्र व कचरा प्रक्रिया प्लांटला अचानक भेट देऊन त्‍यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सिद्धेश देसाई, साहील उपस्थित होते.

या प्लांटमध्ये पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. या नमुन्यासंबंधी आठवडाभरात मंडळाने आपला अहवाल सादर केल्यानंतरच पुढील कारवाई करण्‍यात येणार आहे. दरम्‍यान, आमदार वाझ यांनी केलेल्‍या पाहणीवेळी जलस्रोत खाते, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित खात्यांचे प्रतिनिधी उपस्‍थित होते.

Sancoale News: झुआरीनगर-वास्‍को येथे असलेल्या सांकवाळ पंचायतीच्या सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा केंद्र तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्‍पात कचऱ्याच्‍या राशी आढळून आल्‍या आहेत
Vasco News : बिर्ला-झुआरीनगर येथील आणखी 46 बांधकामे पाडली

सिंदोळी-सांकवाळ नालाही प्रदूषित

सिंदोळी-सांकवाळ भागातून वाहणाऱ्या नाल्यातील पाण्याच्या दुर्गंधीमुळे आसपासच्या लोकांना त्रास सहन करावा लागतोय. इतकी वर्षे त्या पाण्याला दुर्गंधी येत नव्हती. मात्र हा प्रकार अलीकडेच सुरू झालेला आहे. तसेच तेथील बांदोळे तलावाचे पाणीही प्रदूषित झाले आहे. या नाल्यातून वाहत येणारा कचरा व सांडपाणी या तलावात जमा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com