Sancoale News : कचरा शुल्क घोटाळा; पोलिसांत तक्रार नोंदवणार

सांकवाळ ग्रामसभेत निर्णय : सरपंच, उपसरपंचांच्या गैरहजेरीमुळे संताप
Sancoale Panchyat
Sancoale PanchyatDainik Gomantak
Published on
Updated on

Sancoale News : सांकवाळच्या आज रविवारी झालेल्या ग्रामसभेत कचरा शुल्क आकारणीवरून ग्रामस्थांनी बराच गोंधळ घातला. कचरा व्यवस्थापन व शुल्क आकारणीचे कंत्राट ई निविदा काढून कंत्राटदारास द्यावे,असा ठराव गदारोळात संमत करण्यात आला.

या ग्रामसभेला सांकवाळ पंचायत सरपंच व उपसरपंच गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. कचरा शुल्क आकारणी हा घोटाळा असल्याचा दावा करून कचरा शुल्क पावतीच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sancoale Panchyat
Guirim : शेतजमिनी बुजविणे न थांबल्यास गिरीत पूरस्थिती

तसेच या दोघांच्या अनुपस्थितीत सभेचे अध्यक्षपद कुणी भूषवावे, या विषयावर बरीच गरमागरम चर्चा करून शेवटी पंच तुळशीदास नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली.

यावेळी संतोष नाईक, निधी नाईक, जेसिया कादर वालेंतो रॉड्रिग्ज, सचिव आशा मेस्ता उपस्थित होते, तर पंच मावरेलियो कार्व्हालो हे ग्रामस्थांसमवेत बसले होते.

नवीन पंचायत घरासाठी एकूण 14 कोटी खर्च अपेक्षित असून पैकी 3.5 कोटी सरकारकडून अनुदान मिळणार आहे.तेव्हा कमी खर्चात बांधावी,असे ग्रामस्थांनी सांगितले .

पण इमारत बांधण्यापूर्वीच सल्लागार शुल्क म्हणून 10 लाख रुपये भरावे लागणार असल्याचे पंच तुळशीदास नाईक यांनी सांगितले.

Sancoale Panchyat
CRZ Goa: सीआरझेड उल्लंघनप्रश्‍नी 22 वर्षांनी जुवांवला न्याय

‘झुआरी’स शुल्क माफी का?

झुआरीनगर येथील झुआरी ॲग्रो कंपनीची घरपट्टी थकीत असताना पंचायतीने कंपनीला पाच वर्षांची घरपट्टी का माफ केली, असा संतप्त सवाल प्रेमानंद नाईक यांनी करून पंचायतीला धारेवर धरले.

तुळशीदास नाईक म्हणाले, की झुआरीने कंपनी ‘पारादीप’ला विकली असून यांच्याकडून मिळणारे उत्पन्न मोठे असून ते लाभल्यास सांकवाळ सर्वांगसुंदर करता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com