Guirim : शेतजमिनी बुजविणे न थांबल्यास गिरीत पूरस्थिती

ग्रामस्थांचा दावा : उल्लंघनकर्त्यांना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस; सरपंचांची माहिती
Village Panchayat Guirim
Village Panchayat GuirimDainik Gomantak
Published on
Updated on

गिरी पंचायतक्षेत्रात सर्रास मातीचा भराव टाकून शेतजमिनी बुजविण्याचे प्रकार वाढल्याने रविवारची ग्रामसभा तापली. कारण या बेकायदा भरावामुळे पावसाळ्यात गिरी गावात पूरस्थितीचा धोका असल्याचा दावा करून संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी रविवारी झालेल्या ग्रामसभेत केला.

ग्रामस्थांच्या आरोपानंतर सरपंच सनी नानोडकर म्हणाले,की उपजिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू आहे.

Village Panchayat Guirim
Watch Video: जेव्हा हवाईसुंदरी म्हणते, 'आमच्या गोंयांत तुमकां येवकार' पाहा अभिमानास्पद व्हिडिओ

ग्रामसभेत गिरी पंचायत क्षेत्रात बेसुमार मातीचा भराव टाकून जमीन बुजविण्याचे प्रकार वाढल्याने ग्रामस्थांनी पंचायत मंडळास धारेवर धरले. तसेच त्याजागी दुकाने व आस्थापने थाटली जाताहेत, यावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. कारण या भरावामुळे पावसाळ्यात पाण्याच्या निचऱ्यावर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

याविषयी सविना सोझा म्हणाल्या की, गावात शेतजमिनी बुजविण्याचे प्रकार घडताहेत. यामुळे दरवर्षी गिरी पंचायत क्षेत्रात ठिकठिकाणी पूरस्थिती उद्‍भवते. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. दुसरीकडे पंचायत सांगते, की संबंधित विभाग कारवाई करणार, मात्र सरपंच किंवा पंचायत कारवाईसाठी हालचाल करीत नाही.

शेतजमिनी बुजविल्यास पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणार कसा? असा सवाल सोझा यांनी उपस्थित केला. याशिवाय गावात योग्य नाले किंवा गटारांची व्यवस्था नाही, असेही त्या म्हणाल्या.

Village Panchayat Guirim
Dabolim: दाबोळी विमानतळाजवळ कचरा विलगीकरण केंद्राला आग, तीनजण जखमी

सरपंच सनी नानोडकर म्हणाले की, मुळात पंचायतीने कुणालाच जमिनी बुजविण्यास परवानगी दिलेली नाही. संबंधित उल्लंघनकर्त्यांना उपजिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीसा पाठविल्या आहेत.

तसेच पंचायतीने अशा बेकायदा बांधकामांना घरक्रमांक दिला आहे, असा प्रश्न केला असता ते म्हणाले, पंचायतीने दुकान किंवा आस्थापनांना कुठलेच क्रमांक दिले नाहीत, असे स्पष्ट केले. दरम्यान, भाडेकरू पडताळणीवरही चर्चा झाली.झोपड्यांमध्ये कामगार वास्तव्य करताहेत.

म्हादई वळवू देणार नाही !

म्हादई नदीचे पाणी वळविण्यापासून रोखण्यासाठी कर्नाटक सरकारच्या डीपीआरला केंद्र सरकारने दिलेली मंजुरी मागे घ्यावी,असा गिरी पंचायतीने ठराव घेतला.

म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी असून ती कुठल्या स्थितीत जीवनदायिनीचे पाणी कर्नाटककडे वळवू देणार नाही, असा निर्धारही यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. आणि कर्नाटक सरकारच्या कृतीच्या विरोधात या पंचायतीतर्फे ठराव घेऊन त्याच्या प्रती संबंधित विभागांना पाठविण्यात येणार आहेत.

आमदार, जलस्त्रोत खात्याशी पत्रव्यवहार

दरवर्षी पावसाळ्यात गिरी गावात पूरस्थिती उद्‍भवते. पर्वरी, बस्तोडा, हळदोणा, साळगाव, कळंगुट, काणका-वेर्ला या सर्व बाजूने सखल भाग असलेल्या गिरीच्या दिशेने पाणी येते. यामुळे अनेकदा पूरस्थिती किंवा पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात.

त्यामुळे भविष्यात हा प्रश्न भेडसावू नये यासाठी आम्ही संबंधित आमदारांना पत्र पाठवून यावर संयुक्त तोडग्यासाठी लक्ष वेधले आहे. तसेच जलस्त्रोत खात्याला पत्र पाठवले आहे. आणि स्थानिक आमदारांना कळविले असून त्यांनी आवश्यक तोडग्याचे आश्वासन दिल्याचे सरपंच नानोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com