Bhutani Project: भूतानी प्रकल्पाबाबत नवी अपडेट! ‘ॲक्वा ईडन’ प्रकल्पाला दिलासा; गोवा बचाव अभियानची याचिका फेटाळली

Bhutani aqua eden Sancoale: सांकवाळ येथील बहुचर्चित भूतानी ‘ॲक्वा ईडन’ प्रकल्पाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली.
Court Order | Goa Crime News
Margao Court OrderDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सांकवाळ येथील बहुचर्चित भूतानी ‘ॲक्वा ईडन’ प्रकल्पाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

या प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवासी पीटर डिसोझा आणि गोवा बचाव अभियान यांनी जनहित याचिका दाखल केली होती. प्रकल्पाच्या उभारणीला आव्हान देणारी ही याचिका प्रकल्पाला मिळालेल्या परवानग्या बेकायदेशीर असल्याच्या आरोपांवर आधारित होती.

Court Order | Goa Crime News
Bhutani Project: भूतानी प्रकल्पाबाबत नवी अपडेट! सुनावणी पूर्ण; गोवा खंडपीठाकडून निकाल राखीव

याचिकाकर्त्यांनी प्रकल्पाच्या जमिनीचे झालेले रूपांतरण अवैध ठरवण्यासाठी मुख्यत्वे दोन बाबींवर जोर दिला होता. प्रकल्पाची जमीन ज्या ‘सनद’ आधारावर वापरासाठी रूपांतरित करण्यात आली, ती सनद प्रत्यक्षात जुलै २००७ मध्येच कालबाह्य झाली होती आणि तिचे पुनरुज्जीवन व सुधारणा करणे हे बेकायदेशीर होते, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

Court Order | Goa Crime News
Bhutani Project: 'भूतानी'च्या जागेत झाडांची कापणी! वनखात्याच्या पाहणीत धक्कादायक बाब समोर; कारवाईकडे सर्वांचे लक्ष

तसेच या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी केल्याचा दावाही केला होता. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भूतानी प्रकल्पाच्या कायदेशीर वैधतेबाबत त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, प्रकल्पावरील कायदेशीर आणि पर्यावरणीय संकटे अद्याप पूर्णपणे टळलेली नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com