'यावरुन स्टॅलिन यांचा नीच स्वभाव दिसून येतो', सनातन धर्माबद्दल वक्तव्यारून विश्वजीत राणेंची जहरी टीका

नरेंद्र मोदीनी 2024 मध्ये पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील -राणे
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Health Minister Vishwajit Rane On Sanatan Dharma: इंदूर, मध्यप्रदेश येथे भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत सनातन धर्माचा मुद्दा उपस्थित करत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी I.N.D.I.A. आघाडीवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता राज्याचे वन आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्टॅलिन यांच्यासह इंडिया आघाडीवर जहरी टीका केली आहे.

स्टॅलिन जे बोलले त्यावरुव त्यांचा नीच स्वभाव दिसून येतो', अशा शब्दात राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

'स्टॅलिन जे काही बोलले त्यावरून त्यांचा नीच स्वभाव दिसून येतो. अशा विधानावरून या लोकांवर विश्वास ठेवू नये हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. या लोकांचा सर्वनाश होणार आहे. भविष्यात फक्त मोदीजीच देशाचे नेतृत्व करतील. आम्ही सर्वजण सनातन धर्माचे रक्षण करू.' असे विश्वजीत राणे म्हणाले.

Vishwajit Rane
CM प्रमोद सावंत यांच्या समोरच भिडले भाजपचे दोन गट, मध्य प्रदेश जनआशीर्वाद यात्रेत राडा

'नरेंद्र मोदीनी सनातन धर्माला ऊर्जा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे 2024 मध्ये ते पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. सनातन धर्म हजारो वर्षे असाच राहील. या देशात सनातन धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांनाच जीवनात पुढे जाण्यासाठी वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळेल.

Vishwajit Rane
CM सावंत अपरिपक्व त्यांनी पुस्तकातून हिंदू धर्म समजून घ्यावा, इंडिया आघाडीवरील टीकेवरुन गोवा काँग्रेसचा हल्लाबोल

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टीका केल्यानंतर त्याला गोवा काँग्रेसच्या वतीने टीकेच्या स्वरुपातच उत्तर देण्यात आले. 'हिंदू धर्म ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची, नेत्याची जहागीर अथवा खाजगी मालमत्ता नाही. हिंदू हा सनातन धर्म आहे जो आम्हीही आमच्या खाजगी जीवनात तितक्याच तन्मयतेने पाळतो. आमच्याही दैनंदिन जीवनात देव, धर्म व्रतवैकल्ये आहेत हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे.' असे वक्तव्य गोवा कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केले.

'अपरिपक्व व बालीश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी योग्य पुस्तके वाचून हिंदू धर्म समजून घ्यावा. स्वयंघोषीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय पंडितांकडून हिंदू धर्म त्यांना कदापी कळणार नाही.' असा टोला कॉंग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी लगावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com