सॅम्युअलचे खुनी कोण? आत्‍महत्‍येपूर्वी जबर मारहाण, डोळ्‍यावरही प्रहार, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Samuel Garvin De Braganza death case: सॅम्युअल गार्विन डी ब्रागांझा (२२) याच्या मृत्यू प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे.
Samuel Garvin De Braganza death case
Samuel Garvin De Braganza death caseDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा/पणजी: सॅम्युअल गार्विन डी ब्रागांझा (२२) याच्या मृत्यू प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्येपूर्वी त्याला अमानुष मारहाण झाल्याचे समोर आल्याने हा प्रकार आत्महत्या नसून सुनियोजित खुनाचा प्रयत्न तर नव्हता ना, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात संशयाची सुई आता पोलिस यंत्रणेकडेही वळली आहे.

सॅम्युअलचा शवविच्छेदन अहवालाची प्रत रविवारी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांकडे दिली. गोमेकॉच्‍या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी दिलेल्या या अहवालात सॅम्युअलचा मृत्यू गोळी लागल्याने मेंदूला गंभीर दुखापतीमुळे झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

गोळी लागण्याव्यतिरिक्त सॅम्युअलच्या उजव्या डोळ्याभोवती एखाद्या वस्तूने जोरदार प्रहार करण्यात आला होता. त्‍यामुळे डोळ्याभोवती सूज आली. हा आघात एवढा जोरदार होता की सॅम्युअलच्‍या डोळ्याच्या खोबणीचे हाड आतून तुटले होते. ही गंभीर दुखापत आत्‍महत्‍येच्‍या आधी झाल्याचे अहवालात नमूद आहे.

Samuel Garvin De Braganza death case
Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

गोळी शिरली कवटीत : अहवालानुसार, गोळी अत्यंत जवळून झाडण्यात आली. ती सॅम्‍युअलच्‍या उजव्या कानशिलातून कवटीत शिरली. जखमेच्या आसपास काळे डाग, जळाल्याच्या खुणा आढळल्‍या आहेत. गोळी मेंदूतून आरपार जात डाव्या बाजूच्या कवटीच्या हाडात अडकली. फॉरेन्सिक पथकाने ही धातूची गोळी जप्त केली आहे.

पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकाला निलंबित करा

संबंधित पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांना या प्रकरणाच्या तपासातून बाजूला करून निलंबित केले जात नाही, तोपर्यंत या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊच शकत नाही. तपास सीआयडीकडे द्यावा, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली.

डोळ्‍यावरच नव्‍हे, अंगावर अन्‍यत्रही जखमा

सॅम्‍युअलच्‍या डोळ्‍यावरच नव्‍हे तर त्‍याच्‍या पाठीवर आणि शरीराच्‍या अन्‍य भागांलाही मुका मार बसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍याचे स्‍वरूप पाहता त्याला जोरदार मार बसला असावा, असे प्राथमिक निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवल्याचे समजते. शरीरावरील जखमा नेमक्या कशामुळे झाल्या? असा प्रश्‍‍न आता उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांची दिशा का बदलली?

सॅम्‍युअलला सात तास पोलिस स्‍थानकात बसवून ठेवण्‍यात आले, त्‍या काळातील सीसीटीव्‍ही फुटेज आपल्‍याला मिळावेत, अशी मागणी त्‍याच्‍या कुटुंबीयांनी केली आहे. विशेषत: जेव्‍हा त्‍याला बंद केबिनमध्‍ये नेण्‍यात आले होते, तेव्‍हाचे. काही सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांची दिशा मुद्दामहून बदलण्‍यात आल्‍याचा आरोपही करण्‍यात येत आहे.

Samuel Garvin De Braganza death case
Goa Congress: 'काँग्रेस'कडे 2027 साठी नक्की काय प्लॅनिंग आहे? गिरीश चोडणकर 'भाजप'चे तगडे आव्हान कसे पेलणार?

सॅम्‍युअलला पोलिसांनी बंद केबिनमध्‍ये का नेले?

सॅम्‍युअलच्‍या कुटुंबाने आरोप केला आहे की, पोलिसांनी सॅम्युअलला चौकशीच्या नावाखाली तब्‍बल सात तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. काही वेळा त्‍याला बंद केबिनमध्ये नेण्यात आले, जिथे आम्ही त्‍याच्‍यासोबत नव्हतो. त्या बंद खोलीत पोलिसांनी त्‍याच्‍याबरोबर काय केले? त्‍यातच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून त्याचे चारित्र्यहनन करण्यात आले. या अमानुष ट्रोलिंगमुळे सॅम्युअल पूर्णपणे खचून गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com