Samarth Admission Portal 2024: समर्थ संकेतस्थळावर पहिल्याच दिवशी तब्बल सहा हजार अर्ज; ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

Samarth Admission Portal 2024: समर्थ संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया ही विनामूल्य असून विद्यार्थी एकाहून अधिक महाविद्यालयांचा पसंतीक्रम देऊन प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
 Samarth e-Governance website Directorate of Higher Education six thousand applications academic year 2024-2025
Samarth e-Governance website Directorate of Higher Education six thousand applications academic year 2024-2025 Dainik Gomantak

Samarth Admission Portal 2024: २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयीन प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया २७ मेपासून सुरू झाली असून समर्थ ई गव्हर्नन्स संकेतस्थळावर पहिल्याच दिवशी तब्बल सहा हजार अर्ज दाखल झाल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी आणि समर्थ ई गव्हर्नन्सचे मुख्य समन्वयक डॉ. महादेव गावस यांनी दिली.

समर्थ संकेतस्थळाच्या माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया ही विनामूल्य असून विद्यार्थी एकाहून अधिक महाविद्यालयांचा पसंतीक्रम देऊन प्रवेशासाठी अर्ज करू शकतात, असेही डॉ. गावस म्हणाले. समर्थ ई गव्हर्नन्स संकेतस्थळ ७ जूनपर्यंत खुले राहणार आहे. या वाढीव कालावधीमुळे विद्यार्थ्यांना (Students) त्यांचे अर्ज पूर्ण करण्यासाठी आणि आपले पर्याय निवडण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार आहे, असे डॉ. गावस म्हणाले.

१२ वी पुरवणी परीक्षेला बसलेले विद्यार्थीही करू शकतात अर्ज नियमित अर्जदारांव्यतिरिक्त जे विद्यार्थी १२ वीची पुरवणी परीक्षा देत आहेत ते देखील ऑनलाइन अर्ज करण्यास पात्र आहेत, असे डॉ. महादेव गावस म्हणाले. कोणताही विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये हा व्यापक दृष्टिकोन या पाठीमागचा असल्याचे डॉ. गावस यांनी सांगितले.

 Samarth e-Governance website Directorate of Higher Education six thousand applications academic year 2024-2025
CM Pramod Sawant: दिल्ली गाजवलेल्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना बढती मिळणार? त्यांनीच दिली एक्सक्लूसिव्ह माहिती video

‘समर्थ’ची कार्यक्षमता होतेय अधोरेखित

समर्थ ई गव्हर्नन्स संकेतस्थळावर सहा अर्ज दाखल झाल्यामुळे त्यातून समर्थ संकेतस्थळाची कार्यक्षमता अधोरेखित होत आहे. समर्थद्वारे होणारी प्रवेशप्रक्रिया अत्यंत साधी आणि सोपी असल्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याची माहितीही डॉ. गावस यांनी दिली.

 Samarth e-Governance website Directorate of Higher Education six thousand applications academic year 2024-2025
Goa CM Pramod Sawant: कर्नाटकात लय जबरा फसले सीएम सावंत; अचानक हॉटेलची लिफ्ट बंद झाल्यानं उडाली भांबेरी

विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीला असेल प्राधान्य

यंदा जवळपास ४० महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेत सहभागी होत असून विद्यार्थ्यांना निवडण्यासाठी विविध ३८ वैविध्यपूर्ण कार्यक्रम निवडण्याची संधी दिली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:च्या आवडीनिवडी जोपासत करिअर करण्यासाठी अनुकूल वातावरण आणि कार्यक्रम मिळू शकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com