Salcete News : राय गावात होणार हरितक्रांती; शेतजमिनीबरोबरच पर्यटकांनाही आकर्षित करण्यासाठी उपयुक्त

शेतीला चालना : 40 वर्षांनंतर फुलणार मळे; 200 शेतकरी एकवटले
agriculture
agricultureDainik Gomantak
Published on
Updated on

मंगेश बोरकर

गेल्‍या 40 वर्षांपासून राय गावातील नदी-नाले व अन्‍य जलस्त्रोत स्वच्छ न केल्याने शेतकरी हैराण झाले होते. शेती करणे त्‍यांना शक्य नव्हते. शेतकऱ्यांनी सरकारी दरबारी अनेकदा प्रयत्‍न करूनही त्यांना यश प्राप्त झाले नव्‍हते.  या पार्श्वभूमीवर राय पंचायतीने  शावियेर फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता व्यवस्थापन समिती स्‍थापन केली व शेतीला चालना मिळाली. सध्‍या दीड लाख चौरस मीटर शेतजमीन लागवडीखाली आणली जाईल व नंतर तीन लाख चौरस मीटर शेतजमिनीत लवकरच लागवड सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

राय गावात मोठा म्हणजे जवळजवळ दीड किलोमीटर लांब अंतराचा नाला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला ही मोठी शेतजमीन आहे. पण या नाल्यातील पाणी शेतात घुसत असे. त्‍या‍मुळे पीक घेणे शक्य होत नव्हते. आता या नाल्यातील गाळा उपसून तो स्वच्छ केल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला आहे. त्‍यामुळे दोन्ही बाजूला पीक घेणे शक्य होणार आहे, असे शेतकरी बेनेदितो फर्नांडिस यांनी सांगितले.

रायमध्‍ये गेल्‍या ४० वर्षांपासून खरीप पीक बंद झाले होते. आता आम्ही खरीप व पावसाळ्यानंतर रब्‍बी पीकही घेणार आहोत, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्‍यक्त केला आहे. बाकभाट व बेबके ही तळी स्वच्छ केल्याने त्याचा एक-दोन नव्हे तर २०० शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

agriculture
Underground Electricity Goa : भूमिगत वीजवाहिन्यांमुळे वीजपुरवठा सुरळीत होईल; अभियंता मयूर हेदेंचे मत

रंगीबेरंगी पक्षीही ठरताहेत आकर्षण

सदर जागा केवळ शेतीसाठीच उपयुक्त नाही तर तेथे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी येत असतात. हे पक्षी शेतजमिनीतील जीव-जंतू खात असल्‍याने आम्हाला फायदाच होतो. शिवाय हे पक्षी पाहण्यासाठीसुद्धा कित्येक लोक येत असतात. शेतजमिनीत जे बांध आहेत, त्यांचीही दुरुस्ती केली जाईल असे आश्र्वासन आम्हाला मिळाले आहे. एकंदरीत ही जागा आता शेतजमिनीबरोबरच पर्यटकांनाही आकर्षित करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे, असे ज्योकिम क्वाद्रोस व बेनी फर्नांडिस यांनी सांगितले.

agriculture
Goa Monsoon 2023 : मडगाव, केपे परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद; तीन दिवस ऑरेंज अलर्ट

स्थानिक नेते अँथनी बार्बोझा यांच्या सहकार्याने समितीचे पदाधिकारी, राय सरपंच व पंचांनी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांची भेट घेऊन गावातील नाले व जलस्रोत स्वच्छ करण्याची विनंती केली होती. त्यांनी लगेच हे जलस्रोत स्वच्छ करून घेतले. त्यामुळे शेतजमिनीचा विकास करणे आणि शेती करणे शक्य झाले.

शावियेर फर्नांडिस, जैवविविधता व्यवस्थापन समिती प्रमुख

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com