Salaulim Dam OverFlow: काल (बुधवार) अवकाळी पावसामुळे सगळ्यांची धांदल उडाली. या मुसळधार पावसामुळे साळावली धरण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. राज्यात पाऊस संपल्यानंतर धरण पहिल्यांदाच पूर्ण भरले आहे.
काल दिवसभरात एकूण 58.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. दाबोळीत सर्वाधिक 4 इंच पावसाची नोंद झाली आहे. पहाटे 5 वा. गडगडाटासह दमदार पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी काही प्रमाणात वाहतुकीवरदेखील परिणाम दिसून आला. जनजीवनदेखील विस्कळीत झाले.
अचानक मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे राज्यात सुरू असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरदेखील परिणाम दिसून आला. क्रीडाग्राम आवाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अवकाळी पावसामुळे बार्देस तालुकासह शेळपे, धुळेर येथील दोघा शेतकर्यांच्या भातपिकाची नासाडी झाली. वेळीच कापणी यंत्र कृषी खात्याच्या यांत्रीक लागवड अधिकार्यांनी पुरवले नसल्याने हे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.