Sal News : डहाळ्या घरी नेण्याऐवजी वटवृक्षाचेच पूजन करतो! साळ येथील सुवासिनींचे मत

Sal News : वटवृक्षाचे पर्यावरणीय महत्त्व कळाल्याने निर्णय
Sal
Sal Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Sal News :

साळ, सुवासिनींकडून वटपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अगोदर आम्ही वडाच्या डहाळ्या तोडून घरी नेऊन त्याची पूजा करायचो, पण आता वटवृक्षाचे पर्यावरणीय महत्त्व कळाल्याने आम्ही तसं करत नाही,असे वडाच्या पूजेसाठी जमलेल्या महिलांनी सांगितले.

प्रत्येकाने एकेक डहाळी तोडली तर वृक्षाचे मोठे नुकसान होते म्हणजे निसर्गाचे नुकसान होते ते आम्हाला पटले. वटवृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती करतो. एकंदरीत पर्यावरणाचे आम्हीच नुकसान करतो हे आम्हाला पटले आणि ती चूक आम्ही परत करत नाही. पण आता आम्ही वटवृक्षाखाली येऊन त्याची पूजा करतो.

Sal
Goa News: ‘क्रिमीलेयर’बाबत तोडगा काढणार; उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांचे आश्‍‍वासन

साळ येथील वाड्या - वाड्यांवरील घरा - घरांमधून सुवासिनी तसे नववधूंनीही जमून सकाळी ११ नंतर बाबरेश्वर क्षेत्रात असलेल्या वट वृक्षाची त्यांनी यथासांग पूजा केली नंतर दोर गुंडाळून सात फेऱ्या वटवृक्षाला घातल्या व पतीच्या दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद मागितला.

वाण एकमेकींना वाटले

वटपौर्णिमेचे व्रत करणारी प्रत्येक सुवासिनी बाबरेश्वर देवस्थान ठिकाणच्या वडाच्या झाडा खाली येऊन त्याची यथा सांग पूजा करीत आहे.

तसेच या वटवृक्षाला दोऱ्याने सात वेळा फेऱ्या मारून दोरा गुंडाळून त्या वडाकडे आपले मागणे ठेवतात नंतर वट पानाचा द्रोण करून पंचफळाचे तुकडे घालून अनशीच्या दोरात पाच काळे पिडडूके ( मणी ) ओवून गाठ बांधून ते ‘वाण’ आम्ही एकमेकींना वाटले,असे महिलांनी सांगितले. अशा तऱ्हेने या वटपौर्णिमेचा उत्साहात साळ येथे साजरा करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com