CM Pramod Sawant: कर्जबुडव्यांना बसणार चाप; ठगांवर नियंत्रणासाठी ‘ॲप’

CM Pramod Sawant: ‘साखळी अर्बन’ नव्या इमारतीत
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: सहकारी पतसंस्था तसेच बँकांकडून कर्जे घेऊन नंतर ती बुडविणाऱ्या ठग मनोवृत्तीच्या कर्जबुडव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार खाते येत्या 31 मार्चपर्यंत अनोखे ‘ॲप’ आणणार आहे.

CM Pramod Sawant
CM Arvind Kejriwal Case: अरविंद केजरीवाल यांना दिलासा

त्याद्वारे ठरावीक व्यक्ती किती पतसंस्थांमध्ये कर्जदार आहे आणि त्याच्या कर्जाची विद्यमान स्थिती काय आहे, याची माहिती मिळेल. त्यामुळे पतसंस्थांना अशा संशयास्पद कर्जदाराबाबत सतर्कता बाळगण्यास मदत होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केली.

उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, नगराध्यक्ष रश्मी देसाई, संस्थेचे अध्यक्ष अनिल काणेकर, उपाध्यक्ष दत्ताराम पोकळे, संचालक प्रदीप मळीक, प्रेमानंद चावडीकर, संजय देसाई, रामनाथ काणेकर, गीता शिरोडकर, श्रद्धा सुर्लकर, सरव्यवस्थापक कांचन पर्येकर आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सुशांत पोकळे, दत्तगुरू जोशी, अनुप देसाई, योगेश दिवानी, प्रकाश शेट्ये यांचा गौरव करण्यात आला. स्वागत संस्थेचे अध्यक्ष अनिल काणेकर यांनी केले. सूत्रसंचालन राधिका कामत सातोस्कर यांनी, तर आभार उपाध्यक्ष दत्ताराम पोकळे यांनी मानले.

CM Pramod Sawant
Yuri Alemao: झुआरी ऑईल टॅंकिंग कंपनीला कठोर दंड करा; युरी आलेमाव

‘साखळी अर्बन’चे विकासात योगदान

साखळी अर्बनचे पतसंस्थेचे साखळीच्या विकासात मोठे योगदान असून अनेकांना आवश्यक त्यावेळी मदत केली आहे. याच कार्यातील विश्वासामुळे आज ही संस्था यशोशिखरावर पोहोचली आहे. या संस्थेने गरजवंतांना यापुढेही मदतीचा हात देताना अंत्योदय तत्त्वावर काम करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

साखळी अर्बनच्या सर्व संचालक व कर्मचाऱ्यांनी या संस्थेमार्फत अत्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्याचे कार्य करावे. नि:स्वार्थ भावनेने केलेल्या कार्याचे फळ म्हणजे या संस्थेची स्वतःची नवीन इमारत. या संस्थेचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनीही घ्यावा.

- सुभाष शिरोडकर, सहकारमंत्री.

कर्ज बुडविणाऱ्या डिफॉल्ट कर्जदाराविरोधात १३८ कलमान्वये होणारी खटल्याची कारवाई आता आणखी कठोर केली जाणार आहे. कारण अशा पतसंस्थांमधून कर्ज स्वरूपात दिलेले लोकांचे पैसे कोणी सहजासहजी बुडवू शकत नाही. कर्जदाराला अटक करून त्याच्याकडून वसुली करण्यासाठी सरकारचे गृह खातेही आता कठोर बनणार आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com