Panaji News : दर दोन वर्षांनी खात्याकडून लाईनमनला सुरक्षा साधने : ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर

Panaji News : या वर्षी लवकरच नवीन टूल किट
Energy Minister Sudin Dhavalikar
Energy Minister Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Panaji News : पणजी, वीज विभागाकडून त्यांच्या लाईनमन व इतर कर्मचाऱ्यांना दर दोन वर्षांनी सुरक्षेसाठीची साधने,उपकरणे पुरविली जातात. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते, असे ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा अधिवेशनात, हळदोणेचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांना विजेच्या तारांमध्ये काम करणाऱ्या वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अतारांकित प्रश्न विचारला होता.

वीज खाते कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने वेळेवर पुरवत आहे का, असा सवाल फेरेरा यांनी ढवळीकर यांना विचारला होता.

Energy Minister Sudin Dhavalikar
Goa Casino: राज्य सरकारच्या तिजोरीत 820 कोटींची भर; कॅसिनो बंदीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित

या प्रश्नाला उत्तर देताना ढवळीकर यांनी उत्तर दिले की, वीज खाते दर दोन वर्षांनी त्यांचे लाईनमन आणि इतर कर्मचाऱ्यांना वॉटरप्रूफ टूल बॅग, सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट्स, कटिंग प्लायर्स, स्क्रू ड्रायव्हर, लाइन टेस्टर, शॉक प्रूफ हँड ग्लोव्हज, सेफ्टी शूज अशी सुरक्षा उपकरणे वा साधने पुरवते. शिवाय आवश्यकता असेल, तेव्हा या गोष्टी पुरवल्या जातात.

मंत्र्यांनी पुढे नमूद केले की, २०२२ मध्ये लाईनमनला सुरक्षा उपकरणे पुरविण्यात आली होती आणि या वर्षी लवकरच नवीन टूल किट देण्यात येतील. त्यासंबंधी प्रक्रियेला सुरवात झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com