Sadetod Nayak : पणजीवासीयांचा जीव धोक्यात; आमदार, महापौरांनी राजीनामे द्यावेत

‘गोमन्तक टीव्हीवरील सडेतोड नायक’मध्ये वक्त्यांची मागणी
Sadetod Nayak
Sadetod Nayak Dainik Gomantak

Panaji : पणजी शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत महानगरपालिका तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी १,३०० कोटींचा चुराडा केला असून पणजीवासीयांचा जीव धोक्यात घातला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी स्वीकारून स्थानिक आमदार, महापौर तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पातील संचालक तसेच अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे.

ते मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून जाणकार व्यक्तींना या समितीवर घेऊन पणजीला मांडवीत बुडण्यापासून वाचवावे, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी केले. ते ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ गोमन्तक टीव्हीवरील विशेष कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिसिल रॉड्रीग्स तसेच माजी नगरसेवक मिनीन डिक्रुज सहभागी झाले होते.

Sadetod Nayak
Aires Rodrigues: ''मी देशाचे नागरिकत्व सोडले; मात्र भारतीय वंशाचा असल्याने येथेच राहणार...''

आमदार, महापौर कुठे आहेत?

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी आमदार आणि महापौर कोठे दिसत नाही आहेत. नागरिकांनी पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत जर नगरसेवकांना फोन केला, तर कोणी उत्तर देत नाही. नागरिकांच्या समस्या सोडवायला कोणीच येत नाही, अशावेळी सर्वसामान्य पणजीकरांनी कोणाला सांगावे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जे निवडणुकांवेळी दरात लोळण घालतात, तेच गरजेवेळी गप्प राहतात, त्यांना काय म्हणावे? असा सवाल यावेळी सिसिल रॉडिग्स यांनी उपस्थित केला.

Sadetod Nayak
Goa Crime: हसन खान खूनप्रकरणी उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल; पाचही आराेपी...

नगरसेवक गप्पच!

पावसाचे पाणी, गटाराचे पाणी आणि सांडपाणी या तीन घटकांद्वारे येणाऱ्या पाण्यापासून धोका निर्माण झाला आहे. जर स्मार्टसिटीचे काम नियोजनबद्ध पद्धतीने झाले असते, तर ही वेळ आली नसती. नगरसेवकही या कामाविरोधात आवाज उठविताना दिसत नाहीत. पणजीत स्मार्ट सिटीच्या नावाने जी अनागोंदी सुरू आहेत, त्याविरोधी नगरसेवकांनी किमान विरोध तरी करायला नको का? असा प्रश्‍न मिनीन डिक्रुज यांनी उपस्थित केला.

Sadetod Nayak
Goa BJP: राज्यसभेसाठी हालचालींना वेग

जीवन धोक्यात

फुर्तादो म्हणाले, पणजी महानगरपालिका अंतर्गत जी स्मार्ट सिटीची कामे झाली, त्यात तेथील स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासातच घेतले नाही. त्यांना काही न विचारता कामे केल्याने मोठ्या प्रमाणात घोळ झाला. आमदार बाबूश मोन्सेरात आणि महापौर रोहित मोन्सेरात हे स्मार्ट सिटीच्या संचालक पदावर असताना जर पणजीच्या हिताचे निर्णय होत नव्हते, तर त्यांनी त्याला तेव्हाच विरोध का केला नाही?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com