Goa BJP: राज्यसभेसाठी हालचालींना वेग

भाजप आघाडीवर : विरोधकांचा भर मात्र दिल्लीवर; 24 जुलै रोजी होणार मतदान
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची राज्यसभेची मुदत 28 जुलै रोजी संपत असल्याने त्या जागेसाठी 24 जुलै रोजी मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केल्याने या निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे.

भाजपमधून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे उमेदवारीसाठी आघाडीवर असून त्यांचे पारडे जड आहे, तर विरोधकांची सारी भिस्त दिल्लीवरच अवलंबून आहे.

भाजपमध्ये तानावडेंचे पारडे जड

भाजपकडून या जागेसाठी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचा एकमेव अर्ज प्रदेश समितीकडून केंद्रीय समितीकडे सादर केला आहे. त्याला केंद्रीय समितीने अनुमती दिली आहे.

त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित आहे. सध्या भाजपकडे स्वतःचे 28 आमदार आहेत. याशिवाय मगोपचे 2 आणि 3 अपक्षांचा पाठिंबा आहे. असे मिळून 33 आमदार भाजपसोबत आहेत.

Sadanand Shet Tanawade
Aires Rodrigues: ''मी देशाचे नागरिकत्व सोडले; मात्र भारतीय वंशाचा असल्याने येथेच राहणार...''

विरोधक सुशेगाद

निवडणुकीत नेहमीच विरोधकांपेक्षा चार पावले पुढे असलेल्या भाजपने राज्यसभेसाठीही कंबर कसली आहे. मात्र, विरोधी पक्षांचे नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर अवलंबून आहेत.

अद्याप ही निवडणूक लढवायची की नाही? उमेदवारी कोणाला द्यायची? याचा निर्णयच झालेला नाही. विरोधकांकडे काँग्रेसचे ३, ‘आप’चे २, तसेच गोवा फॉरवर्ड आणि आरजी यांचे प्रत्येकी एक मिळून सात आमदार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com