Goa Forests: धोक्याची घंटा वाजतेय! गोव्यातील 'देवराई' गायब होत चालल्या आहेत..

Sacred Groves of Goa: गोव्यातील बहुतांश पवित्र वनराईंसाठी (देवराई) सर्वात मोठा धोका म्हणजे त्यांच्या जतनासाठी कमी होत चाललेला विश्वास आणि त्या विषयीचे मूल्य जाणून घेण्याच्या इच्छेचा अभाव.
Sacred Groves
Forest Dainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. डेरेक मोन्तेरो

Goa’s Sacred Groves in Danger:गोव्यातील बहुतांश पवित्र वनराईंसाठी (देवराई) सर्वात मोठा धोका म्हणजे त्यांच्या जतनासाठी कमी होत चाललेला विश्वास आणि त्या विषयीचे मूल्य जाणून घेण्याच्या इच्छेचा अभाव. त्याशिवाय जंगलांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि त्यांच्या संवर्धनासाठी स्पष्ट उपाययोजनांचा अभाव हे देखील धोकादायक आहे’, असे मत पर्यावरण तज्ज्ञ डॉ. डेरेक मोन्तेरो यांनी व्यक्त केले.

मिरामार येथील क्लब टेनिस दे गॅस्पर डायस संस्थेच्या शताब्दी वर्ष समारंभाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. व्यवस्थापन अभ्यासातील पीएचडी असलेल्या व इको टुरिझमची पदव्युत्तर पदवी घेतलेल्या मोन्तेरो यांनी आपल्या भाषणात तरुण पिढीला परंपरा आणि गावांच्या भविष्याचे संरक्षक असे संबोधून ह्या गोष्टी पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेला विश्वास आणि श्रध्दा गमावू नका असे आवाहन केले.

‘सेक्रेड ग्रुव्हज् ऑफ गोवा’ ह्या शीर्षकाच्या त्यांच्या ह्या भाषणात, मोन्तेरो यांनी पवित्र वनराईंचा इतिहास सादर केला. “लोकांना वनांच्या महत्त्वाची जाणीव वैदिक कालापासूनच होती. त्यामुळे त्यांनी काही वनक्षेत्रे पवित्र मानून राखली. अशा पवित्र जागेतील एक पान देखील नेण्यास मनाई असायची. त्यामुळे ही वने जैवविविधतेचे अभयक्षेत्र असायची,” असे मोन्तेरो यांनी स्पष्ट केले. ‘आज या वनांवरील सर्वात मोठे संकट म्हणजे देव ह्या संकल्पनेवरील कमी होत असलेला विश्वास होय’ असेही ते पुढे म्हणाले.

लोकसंख्या वाढ, बांधकामे आणि संसाधनांच्या शोषणामुळे ह्या देवराया अधिकच असुरक्षित झाल्या आहेत. सत्तरी तालुक्यातील मायरिस्टीका दलदल आणि मलाबार ट्री निंफ ह्या फुलपाखरांचा अधिवास असलेल्या ‘निरंकारची राय’ ह्या जागेभोवती नवीन बांधकामे येत असल्याने ही देवराई देखील धोक्यात आहे, हे देखील मोन्तेरो यांनी निदर्शनास आणले. 

या संदर्भात बोलत असताना, पवित्र स्थळे आणि शिल्पांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद ठेवण्याचे व अतिक्रमण रोखण्यासाठी बफर झोनची स्थापना करण्याचे आवाहन त्यांनी केले. “आपल्याला खरोखर जलद गतीने काम करण्याची गरज आहे, कारण वनराईंच्या आजूबाजूला बांधकामे उभी राहात आहेत. उदाहरणार्थ डिचोली तालुक्यातील ‘नागवेची राय’जवळ प्रचंड प्रमाणात बांधकामे होत आहेत,” हे त्यांनी नमूद केले.

Sacred Groves
Spiritual Tourism: गोव्यात 'एकादशा तीर्थयात्रा' उपक्रम! प्रमुख 11 मंदिरांना देता येणार भेटी; आध्यात्मिक पर्यटनाला संजीवनी

केवळ सरकार किंवा पर्यटनाव्दारे नव्हे तर समुदायाची जागरूकता, विश्वास आणि कृतीव्दारे निसर्गाचे जतन झाले पाहिजे यावर मोन्तेरोनी भर दिला. “सत्तरी तालुक्यात असलेल्या झर्मे येथील जंगलात १५ मूर्ती पडून आहेत. आजपर्यंत किती मुर्ती गायब झाल्या आहेत याची कोणतीही यादी नाही,” असे म्हणत ह्या असुरक्षित सांस्कृतिक खजिन्याचे दस्तावेजीकरण करण्याचेही आवाहन मोन्तेरो यांनी केले.

Sacred Groves
Goa's Environment: गोव्याचे पर्यावरण! गतवैभव, सध्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने

डॉ. मोन्तेरो यांनी मागील सहा वर्ष केलेल्या संशोधनातून, म्हादई वन्यजीव अभयारण्यातील आजोबाची राय येथील झऱ्याबद्दल, कोपर्डे येथील देवाची रायमधील उपाचारासाठी प्रसिद्ध असलेल्या तळ्याबद्दल आणि राज्यात पाळल्या जाणाऱ्या विविध गावांतील धार्मिक विधींबद्दल माहिती दिली. तसेच अस्ताव्यस्त वाढत चाललेल्या पर्यटनापासून ह्या राईंचे संरक्षण केले पाहिजे यावरही त्यांनी भर दिला. तथापी जागरूक स्थानिक लोकांच्या नेतृत्वाखालील पर्यावरण-संवेदनशील भ्रमंतीचे समर्थन करून उपस्थितांना त्या जागांचे महत्त्व प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी त्या ठिकाणांना भेट देण्याचे आवाहन देखील केले.  “तिथे जा, तेथील विधी पहा, कथा समजून घ्या, तरच त्यांचे संरक्षण करण्याची गरज तुमच्या लक्षात येईल,” असे डॉ. मोन्तेरो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com