Sacorda: '2 लाख 42 हजार नेमके कुठे खर्च झाले'? साकोर्डा ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार! पंच-सरपंचांच्या राजीनाम्याची होतेय मागणी

Sacorda Panchayat: ग्रामस्थांना स्पष्टीकरण देण्यासाठी सरपंच संजना नार्वेकर व पंचायत सचिव संदीप हल्याळ हे दोघेही टाळाटाळ करत असल्याने जनतेच्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
Sacorda panchayat gramsabha
Sacorda panchayat gramsabha Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: साकोर्डा पंचायत क्षेत्रातील झाडाझुडपांची काटछाट आणि इतर कामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. यासंबंधी ग्रामस्थांना स्पष्टीकरण देण्यासाठी सरपंच संजना नार्वेकर व पंचायत सचिव संदीप हल्याळ हे दोघेही टाळाटाळ करत असल्याने जनतेच्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. ग्रामस्थांना सामोरे जाण्याची हिंमत नसल्यास सरपंच आणि संबंधित इतर पंचांनी त्वरित राजीनामे द्यावेत, अशी जोरदार मागणी या पंचायतीच्या दोघा पंचांसह एका आरटीआय कार्यकर्त्याने केली आहे.

साकोर्डा पंचायतीची ग्रामसभा झाडाझुडपांची कापणी आणि इतर प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारावरून गाजली होती. ही ग्रामसभा पहिल्यांदा घेण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तहकूब करण्यात आली आणि दुसऱ्याच आठवड्यात पुन्हा घ्यावी लागली.

मात्र, त्यावेळीही ग्रामसभा तहकूब करण्यात आली, यावरून पंचायत क्षेत्रात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे या पंचायतीचे एक पंच सदस्य महादेव शेटकर तसेच महिला पंच गायत्री मापारी आणि आरटीआय कार्यकर्ते विपिन नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या गैरव्यवहारप्रकरणी पंचायत सचिवाविरूद्ध तक्रार करण्यात आली आहे. या एकंदरीत गैरव्यवहाराची चौकशी मुख्यमंत्री तसेच पंचायतमंत्र्यांसह पंचायत संचालकांनी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

या आर्थिक घोटाळ्यात सरपंच, पंचायत सचिवासह अन्य दोन पंच सदस्य गुंतले असल्याचा आरोप विपिन नाईक यांनी केला आहे. माहिती हक्क कायद्याखाली पंचायत क्षेत्रातील एका कामासंबंधी जी कागदपत्रे उपलब्ध झाली, त्यात २ लाख ४२ हजार रुपये नेमके कुठे खर्च झाले त्याचा हिशेब सरपंच आणि पंचायत सचिवाने द्यावा लागेल, असेही विपिन नाईक म्हणाले. याप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याची लेखी तक्रार उपसरपंच शिरिष देसाई यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Sacorda panchayat gramsabha
Sacorda: साकोर्डा ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक! निधीच्या विषयावरुन जोरदार खडाजंगी; सचिवाकडून मात्र उत्तर देण्यास नकार

गेल्या ग्रामसभेत या गैरव्यवहारासंबंधी ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नाहीत. थातूरमातूर कारणे देऊन सभा सोडून जाण्याचे कारण काय, असाही सवाल उपस्थित होत आहे. साकोर्डा पंचायत क्षेत्रात कचरा गोळा करण्यासाठी ग्रामस्थांकडून शुल्क आकारले जाते.

मात्र, प्रत्यक्षात घरोघरी कचरा गोळा होताना दिसत नाही. हे पैसे नेमके कुठे जातात, पर्यटनाच्या नावाखाली शुल्क वसूल केले जातात, त्यातही घोटाळा असल्याचा आरोप पंच सदस्य महादेव शेटकर यांनी केला आहे.

ग्रामसभेत आपल्याला धमकी दिलेल्या प्रशांत गावकर याच्याविरुद्ध कुळे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवूनही अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे विपिन नाईक म्‍हणाले.

Sacorda panchayat gramsabha
Sacorda: पाण्याविना पिके लागली करपायला, साकोर्डातील बागायतदार संतप्त; इरिगेशन प्लांटवर दिली धडक

सहा महिन्यांतील कामाची चौकशी करा!

गेल्या सहा महिन्यात साकोर्डा पंचायत क्षेत्रातील कामाची चौकशी करण्याची मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. सरपंचासह इतर काही पंच सदस्य त्यात गुंतले असून पंचायत सचिवाची सखोल चौकशी करण्याची मागणी करून आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश आता सरकारी यंत्रणेने करावा, अशी मागणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com