Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात! काणकोण येथील 'क्रीडा आंगण' सभागृहाचं सचिनच्या हस्ते होणार उद्घाटन

Sachin Tendulkar: चाररस्ता येथील सेंत्रो प्रोमोतर द इस्त्रुसांव संस्थेचे श्री मल्लिकार्जुन विद्यालय व संलग्न शैक्षणिक शाखांच्या ‘क्रीडा आंगण’ या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्‌घाटन सचिनच्या हस्‍ते होईल.
Sachin Tendulkar In Goa
Sachin Tendulkar In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : ‘भारतरत्न’ माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर शुक्रवारी (ता. २२) काणकोणात येणार आहे. चाररस्ता येथील सेंत्रो प्रोमोतर द इस्त्रुसांव संस्थेचे श्री मल्लिकार्जुन विद्यालय व संलग्न शैक्षणिक शाखांच्या ‘क्रीडा आंगण’ या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्‌घाटन त्‍याच्‍या हस्‍ते होईल.

सचिन तेंडुलकरला ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखलं जातं. त्याच्या कारकिर्दीतील अनेक विक्रम आजही क्रिकेटविश्वात तेजाने चमकत आहेत. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारे ते एकमेव क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या हस्ते ‘क्रीडा आंगण’ चे उद्घाटन होणे ही केवळ शैक्षणिक संस्थेसाठीच नव्हे, तर काणकोणवासीयांसाठी मोठी अभिमानाची बाब ठरणार आहे.

Sachin Tendulkar In Goa
Goa Politics: 'बाप्‍पा' पावला... तवडकर, कामतांच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ; 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

सचिन तेंडुलकरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, जो स्वतःच एक जागतिक विक्रम आहे. सचिन हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने २०० कसोटी सामने खेळले आहेत. कोणत्याही खेळाडूसाठी त्याचा विक्रम मोडणे सोपे होणार नाही. सध्या असा कोणताही फलंदाज नाही जो २०० कसोटी किंवा ४६३ एकदिवसीय सामने खेळू शकेल.

Sachin Tendulkar In Goa
Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावली आहेत. सचिनचा हा विक्रम मोडणे जगातील कोणत्याही फलंदाजासाठी खूप कठीण काम असेल. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके आणि एकदिवसीय स्वरूपात ४९ शतके झळकावली आहेत. त्यानंतर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने ८२ शतके झळकावली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com