

केरळमधील (Kerala) शबरीमाला (Sabarimala Temple) येथील भगवान अयप्पा मंदिर 17 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पाच दिवसांच्या मासिक विधीसाठी सुरू राहणार आहे. दर्शनास येऊ इच्छिनाऱ्या भाविकांना 48 तासांच्या आतला RTPCR टेस्टचा निगेटिविह रिपोर्ट किंवा लसीचे दोन्ही डोस घणे आवश्यक असणार आहे, या अटी पुर्ण केल्या तरच त्यांना दर्शनासाठी परवानगी असेल. (Sabarimala temple will be open for devotees for 5 days)
दर्शनासाठी भाविकांना प्रथम ऑनलाईन बुक करावे लागणार असुन दररोज केवळ 5,000 भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे भाविकांना कमी प्रवेशावर मर्यादा ठेवण्यात आल्याचे समजते आहे. कोरोना (Covid19) विषाणूमुळे शबरीमाला मंदिर बंद होते. तर आता मंदीर सुरु करण्यात आले असले तरी, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भाविकांना फेस मास्क, सोशल डिस्टंगसींग यांसारख्या नियमांचे पालन करावे लागेल.
21 जुलै रोजी मासिक विधी पूर्ण झाल्यावर शबरीमाला मंदिर पुन्हा बंद होणार आहे. सबरीमाला मंदिर प्रत्येक महिन्यात मासिक विधीसाठी उघडले गेले जात होते, मात्र भाविकांना प्रवेश नव्हता. सबरीमाला मंदिर हे भारतातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात. सबरीमाला मंदिराचे नाव रामायणात उल्लेख केलेल्या शबरीच्या नावावर आहे. मंदिराच्या सभोवतालचे 18 पर्वत मंदिराच्या सौंदर्यात आणखी वाढ करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.