MH-60R हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतीय नौदलात दाखल

हेलिकॉप्टरचे (Helicopter) अमेरिकी नौदलाकडून (US Navy) भारतीय नौदलाकडे (Indian Navy) अधिकृत हस्तांतरण झाले.
MH-60R Helicopter
MH-60R HelicopterDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय नौदलाने (Indian Navy) MH-60R या बहुकार्यप्रवण असलेल्या दोन हेलिकॉप्टरची (Helicopter) पहिली तुकडी अमेरिकेच्या नौदलाकडून (American Navy) सॅन दिएगो येथे नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर समारंभपूर्वक स्वीकारली. या हेलिकॉप्टरचे अमेरिकी नौदलाकडून भारतीय नौदलाकडे अधिकृत हस्तांतरण झाले. भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी भारतीय नौदलाच्या वतीने ही हेलिकॉप्टर्स स्वीकारली. या समारंभात अमेरिकी नौदलाच्या हवाई दलाचे कमांडर वाईस ऍडमिरल केनेथ व्हिटसेल यांनी या हेलिकॉप्टरची कागदपत्रे भारतीय नौदलाचे उपनौदलप्रमुख वाईस ऍडमिरल रवनीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केली. (First batch of MH-60R helicopters entered the Indian Navy)

MH-60R Helicopter
MH-60R HelicopterDainik Gomantak

MH-60R या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या अमेरिकी कंपनीने केले असून सर्व प्रकारच्या हवामानात विविध प्रकारच्या मोहिमांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक एवियॉनिक्स/सेन्सर्सचा वापर करून त्यांची रचना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या 24 हेलिकॉप्टर्सची खरेदी अमेरिकेकडून करण्यात येत आहे.

Indian Navy and US Navy Officials
Indian Navy and US Navy Officials Dainik Gomantak

या हेलिकॉप्टरमध्ये विविध प्रकारची भारतीय सामग्री आणि शस्त्रे बसवण्यासाठी सुधारणा देखील करण्यात येणार आहे. MH-60R या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या त्रिमितीय क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. या हेलिकॉप्टरचा त्यांच्या क्षमतेनुसार वापर करता यावा यासाठी भारतीय कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे सध्या अमेरिकेत प्रशिक्षण सुरू आहे.

Indian Navy Officials
Indian Navy Officials Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bihar Police AK47 Firing On Students Video
CJP Protest Violence Pakistan Social Media Connection
CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन
Kerala MLA MP Cabinet Berth Fraud Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com