Ruturaj Gaikwad: चेन्नईचा कर्णधार गोव्याच्या किनाऱ्यावर... ऋतुराजनं पत्नीसोबत लुटला वॉटर स्पोर्ट्सचा आनंद

Chennai Super King Captain: टीम इंडियाचा फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत खूप काही मिळवलं आहे.
Ruturaj Gaikwad
Ruturaj GaikwadDainik Gomantak
Published on
Updated on

Ruturaj Gaikwad In Goa

टीम इंडियाचा फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत खूप काही मिळवलं आहे. तो टीम इंडियासाठी निळ्या जर्सीत खेळला असून त्याने आयपीएलमध्येही खूप धमाल केली आहे. दरम्यान, ऋतुराज आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

ऋतुराज गायकवाड आपल्या पत्नीसोबत गोवा फिरायला गेला आहे. त्यानं आपल्या पत्नीसोबत गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटला आहे. ऋतुराजचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतं आहे. प्रसिध्द मच्छीमार पेले यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे.

ऋतुराज गायकवाड बाणावली समुद्रकिनाऱ्यावर पत्नीसोबत वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेताना दिसला. मच्छीमार पेले यांनी यावेळी ऋतुराजशी संवादही साधला. यावेळी बोलताना ऋतुराजनं आय लव गोवा, आय लव पेले असं म्हटलं.

भारताच्या संघात ऋतुराजला सध्या संधी मिळात नाहीय. गेल्या काही सामन्यांमध्ये ऋतुराजच्या पदरी अपयश येत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतही ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली नाही.

ऋतुराजनं भारतासाठी शेवटचा टी-२० सामना जुलै २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता. त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये जास्त संधी मिळालेल्या नाहीत.

Ruturaj Gaikwad
Vintage Goa: 90s मधला गोवा पाहायचा आहे? पटकन Click करा..

ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये आपली छाप सोडली आहे. चेन्नईसाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. महेंद्रसिंह धोनीच्या जागी २०२४ मध्ये ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आल होते.

यानंतर २०२४ मध्येही तो चांगल्या फॉर्मात होता, कर्णधार म्हणून त्याने १४ डावांत एका शतकासह ५८३ धावा केल्या होत्या. २०१९ मध्ये चेन्नईने त्याला २० लाख रुपयांना विकत घेतले होते, परंतु २०२० मध्ये त्याला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.

Ruturaj Gaikwad
Goa Education: यंदापासून नववीतील विद्यार्थी थेट दहावीत, पाचवी-आठवीत बोर्डासमान परीक्षा; नेमके काय झालेत बदल, पहा Video

सुरुवातीला त्याला संघर्ष करावा लागला, पण नंतर त्यानं दमदार कामगिरी करत २०२० मोसमाच्या अखेरीस तीन अर्धशतके झळकावली होती. २०२१ च्या हंगामात त्याने दमदार कामगिरी करत ६३५ धावा काढल्या आणि ऑरेंज कॅप (हंगामातील सर्वाधिक धावा) जिंकली होती.

२८ जुलै २०२१ त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. श्रीलंकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्यानं १८ चेंडूत २१ धावा केल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com