Sameer Panditrao
१९९४-९५ चा गोवा हा मोकळे रस्ते, शांत वातावरणामुळे आजच्या गोव्यापेक्षा वेगळा होता.
गोव्याचे समुद्रकिनारे त्या काळी अधिक स्वच्छ आणि नितळ होते.
लहान झोपडीवजा कॅफे आणि घरगुती चव असलेल्या खानावळी पाहायला मिळत.
गोव्याची बाजारपेठही खूप छोटी आणि निवांत होती. मार्केटमध्ये तुरळक गर्दी दिसायची
शक्यतो स्थानिक उत्पादने आणि मासळी विक्रीला असायची
सीझनलाही गर्दी नसायची, बीचवर शांतता होती
रस्ते मातीचे होते, गोव्यातली सगळी घरे देखील पारंपरिक होती.