
बंगळूर: कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील कुमठा तालुक्यातील घनदाट रामतीर्थ टेकड्यांमध्ये वसलेल्या एका दुर्गम गुहेतून आध्यात्मिक प्रवृत्तीच्या रशियन महिलेला आणि तिच्या दोन लहान मुलांना बाहेर काढण्यात आले, असे पोलिस अधिकाऱ्याने आज सांगितले.
पोलिसांनी या महिलेची ओळख ४० वर्षीय नीना कुटीना ऊर्फ मोही अशी सांगितली. ती रशियाहून बिझनेस व्हिसावर आली आणि हिंदू धर्म आणि आध्यात्मिक परंपरांनी आकर्षित होऊन गोवामार्गे गोकर्ण येथे पोचली.
तिची मुले, प्रेया (वय ६) आणि अमा (वय ४) तिच्यासोबत जंगलात गेली. जिथे ते जवळजवळ दोन आठवड्यांपासून एकांतवासात राहात होते. त्या कुटुंबाने जंगले आणि उंच उतारांनी वेढलेल्या गुहेत घर बनवले होते. तिथे मोही हिने रुद्राची मूर्ती ठेवली आणि निसर्गाच्या सान्निध्यात आध्यात्मिक शांती मिळविण्यासाठी पूजा आणि ध्यानात दिवस घालवले.
तिथे दोन लहान मुलेच तिची सोबती होती. शुक्रवारी झालेल्या भूस्खलनानंतर नियमित गस्त घालत असताना मंडल पोलिस निरीक्षक श्रीधर आणि त्यांच्या पथकाला गुहेबाहेर कपडे दिसले. अधिकारी रामतीर्थ टेकडीच्या दाट झुडुपांमधून मार्ग काढत आत गेले आणि त्यांना मोही आणि तिची दोन मुले गुहेत आढळली.
साध्वी चालवत असलेल्या आश्रमात तिची राहण्याची व्यवस्था केली आहे. तिला गोकर्णहून बंगळूरला घेऊन जाण्याची आणि परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने रशियन दूतावासाशी संपर्क साधला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.