रस्ता चुकला, गाडी चिखलात रुतली; मनालीतून गोव्याला येताना रशियन महिलेवर आले संकट, पोलिस, स्थानिक धावले मदतीला

Russian Women: दुचाकी बाहेर काढल्यानंतर महिलेला गोव्याला जाण्याचा योग्य मार्ग दाखविण्यात आला. महिलेच्या मदतीला पोलिस आणि स्थानिक धावल्याने रशियन महिला भारावून गेली होती.
Russian woman rescued in Manali
Himachal Pradesh Police Helped Russian WomenDainik Gomantak
Published on
Updated on

हिमाचल प्रदेश: प्रसिद्ध पर्यटनस्थळ मनाली येथून गोव्याच्या दिशेने येताना रशियन महिला अडचणीत सापडली. रशियन महिलेला इंग्रजी येत नसल्याने तिला मदत करण्यास देखील अडथळा येत होता. अखेर हिमाचल प्रदेश पोलिस, स्थानिक शिक्षक आणि गावकरी महिलेच्या मदतीला धावले. रस्ता चुकलेल्या महिलेची दुचाकी चिखलात अडकल्याने महिला हतबल झाली होती.

हिमाचल प्रदेश पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय रशियन महिला प्रसिद्ध पर्यटनस्थळ मनाली येथे पर्यटनासाठी आली होती. पर्यटन झाल्यानंतर ती गोव्यात पर्यटनासाठी येत होती. दरम्यान, भूंखरी गावात महिलेची दुचाकी चिखलात फसली. महिलेला इंग्रजी भाषा येत नसल्याने तिला मदत करण्यास अडथळा येत होता. या घटनेची माहिती बद्दी पोलिस स्थानकाला देण्यात आली.

Russian woman rescued in Manali
Kadamba Bus: "दारू पिऊन बस चालवल्यास घरचा रस्ता दाखवणार" KTCचा आक्रमक पवित्रा; तुयेकरांनी दिले कठोर निर्देश

बद्दी पोलिसांनी गावापासून जवळच असणाऱ्या रामशहर पोलिस स्थानकात पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होण्यास सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेतला. महिलेची दुचाकी चिखलात फसली होती. शिवाय तिच्या गोव्याला जाण्याचा मार्ग देखील चुकला होता, असे लक्षात आले. पोलिस, स्थानिकांनी महिलेची फसलेली दुचाकी मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढली.

Russian woman rescued in Manali
Kanpur Crime: कानपूर हादरलं! 5 रुपयांचे आमिष देऊन 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; 13 आणि 8 वर्षाच्या मुलांनी केले कुकृत्य

दुचाकी बाहेर काढल्यानंतर महिलेला गोव्याला जाण्याचा योग्य मार्ग दाखविण्यात आला. महिलेच्या मदतीला पोलिस आणि स्थानिक धावल्याने रशियन महिला भारावून गेली होती. तिला अश्रु अनावर झाले. केलेल्या मदतीबद्दल तिने पोलिस आणि स्थानिकांचे आभार मानले. पोलिसांनी महिलेला गोव्याला जाण्याचा योग्य मार्ग दाखवला.

हिमाचल प्रदेश पोलिसांनी सोशल मिडियावर या घटनेची माहिती दिली आहे. हिमाचल प्रदेश पोलिस लोकसेवा आणि संवेदनशीलता आणि प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. स्थानिक असो किंवा विदेशी नागरिक पोलिस नेहमीच सेवेसाठी तत्पर आहेत,  असे पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com