First Charter Flight: रशियनांची पाठ; मात्र इस्रायलींचा पर्याय

पर्यटन हंगाम : पहिले चार्टर विमान 1 आक्टोबरला येण्‍याची शक्‍यता
The first charter flight is likely to arrive on October 1 in Goa
The first charter flight is likely to arrive on October 1 in Goa Dainik Gomantak

Goa Tourism: रशियन पर्यटकांनी गोव्‍याकडे पाठ वळविण्‍यास सुरुवात केलेली असताना त्‍यांना पर्याय म्‍हणून गोव्‍यातील पर्यटन व्‍यावसायिकांनी इस्रायली पर्यटकांना पसंत करणे सुरु केले आहे. 1 ऑक्‍टोबरपासून गोव्‍यातील पर्यटन मौसम सुरु होणार असून त्‍या दिवशी पहिले चार्टर विमान गोव्‍यात दाखल होण्याची शक्‍यता जाते.

The first charter flight is likely to arrive on October 1 in Goa
Goa Ganesh Fastival: माळ्यातलो झरीकार' संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

कौटुंबिक पर्यटनाकडे जास्‍त लक्ष देणाऱ्या रशियन पर्यटकांचे गोवा हे आतापर्यंतचे आवडते ठिकाण राहिले आहे. मात्र जास्‍त पैसा खर्च करणारा रशियन पर्यटक गोव्‍याऐवजी आता दुबईला अधिक पसंती देत आहे. या परिस्‍थितीत इस्रायली पर्यटकांकडे गोवा पर्याय म्‍हणून पाहू लागले आहे.

सात-आठ वर्षापूर्वी गोव्‍यात इस्रायली पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत होते. मात्र काही वर्षात ही संख्‍या कमी झाली होती. मात्र आता पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍याकडे लक्ष देण्‍याचे गोवा सरकारने ठरविले आहे.

The first charter flight is likely to arrive on October 1 in Goa
P.S.Shreedharan Pillai : राज्यपालांनी जपली सामाजिक बांधिलकी; 384 रुग्णांना 96 लाखांची मदत

इस्रायली पर्यटक सुद्धा अधिक पैसे खर्च करणारा असल्‍याने गोव्‍यासाठी ते फायदेशीर होऊ शकतात, अशी माहिती पर्यटन व्‍यावसायिकांकडून मिळाली आहे.

बहुतांश पर्यटक रशिया व ब्रिटनमधील

महागडे रशियन पर्यटक आता दुबईकडे आकर्षित होत आहेत, हे जरी खरे असले तरी सर्वसाधारण रशियन पर्यटकांमध्‍ये गोवा आजही आवडीचे ठिकाण म्हणून आहे. गोव्‍यात प्रत्‍येक वर्षी अडीच लाखांहून अधिक विदेशी पर्यटक येत असून त्‍यातील बहुतांश रशिया व ब्रिटनमधील असतात. मात्र यावेळी इस्रायली पर्यटक यांच्‍यावरही व्‍यावसायिकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. यंदा इस्रायलमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक गोव्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे, अशी माहिती सीटा ट्रॅव्‍हर्सचे आर्नेस्‍ट डायस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com