Crmie News
Crmie News Dainik Gomantak

Crime Goa: धक्कादायक! विदेशी पर्यटक महिलेवर कळंगुट येथे बलात्कार

''गुन्हेगारी प्रकरणांचा वेग वाढताच''
Published on

गोवा राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, मारामारी, बलात्कार, अमली पदार्थ तस्करी सारख्या गुन्ह्यांचे प्रकार वाढले असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. ती आता खरी ठरु लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज एका विदेशी पर्यटक महिलेवर कळंगुटमधील हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

( Russian tourist woman raped in Calangute)

Crmie News
Goa police: अमली पदार्थविरोधी कारवाईचा धडाका सुरूच; हणजूण, मडगाव येथील तिघे जेरबंद

मिळालेल्या माहितीनुसार आज कळंगुट पोलिसात एका 37 वर्षीय रशियन पर्यटक महिलेवर कळंगुटमधील हॉटेलमध्ये बलात्कार झाला असल्याची तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केला आहे.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास पथक तयार करत या प्रकरणातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. शकील अन्सारी उर्फ सलमान झिरा जलाहा (23 ) व सहिमुद्दीन अन्सारी अब्दुल अली जलाहा (22) अशी संशयितांची नावे आहेत. तसेच दोघे ही नेपाळचे नागरीक असल्याची माहिती समोर आली आहे.

Crmie News
Illegal Construction: गोवा खंडपीठाची धडक कारवाई; नियमबाह्य बांधकाम पाडण्याचा आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रशियन पर्यटक महिला गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात वास्तव्य करते आहे. पर्यटनाच्यानिमित्ताने ती गोव्यात वास्तव्यास असताना गैरफायदा घेत दोन नेपाळी युवकांनी अत्याचार केल्याचे पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असुन प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com