First Russian Flight in Goa: मोरजी, आश्वे रशियन पर्यटकांसाठी हॉटस्पॉट; रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासन लक्ष देणार का?

Russian Tourist First Flight To Goa: रशियातून पहिल्या फ्लाईटने काही पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.
Russian Tourist In Goa
Russian Tourist In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Russian Tourist First Flight in Goa: मोरजीकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. परतीच्या पावसाने त्यात आणखी भर टाकली असली तरी यामुळे रशियन पर्यटकांच्या उत्साह अजिबात कमी झालेली नाही. रशियातून पहिल्या फ्लाईटने काही पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

'गोवा खूप सुंदर आहे. आम्ही भारतात सुट्यांचा आनंद घेण्यासाठी येत असतो आणि येथे आजवर आम्हाला काहीही त्रास झालेला नाही', असे मोरजी मार्केटमधून फेरफटका मारणाऱ्या रशियन पर्यटक सर्गी यांनी सांगितले.

'रशियन पर्यटक खूप खर्च करत नसले तरी आम्हाला पैसे कमविण्यासाठी मदत करतात. बहुतेक परदेशी पर्यटकांप्रमाणे रशियन पर्यटक देखील विनम्र आहेत आणि आम्हाला त्रास देत नाहीत', असे मद्यालय चालवणाऱ्या संगीता यांनी सांगितले.

रशियामध्ये थंडी पडायला सुरुवात झाली असून, सेना तिच्या दोन मुलांसह रविवारी पहिल्या फ्लाईटने गोव्यात दाखल झालीय. सेना येथील स्थानिक लोकांसोबत संवाद साधण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा वापर करते.

Morjim Road
Morjim RoadDainik Gomantak
Russian Tourist In Goa
Drug Nexus In Goa: संगीत पार्ट्या अमली पदार्थ तस्करीचे तळ; पोलिसांचे अभय, गोव्यासाठी धोक्याचा इशारा

पहिल्या विमानाने रशियातून येणारे अनेक पर्यटक मोरजी किंवा अश्वे येथेच निवास करण्यासाठी प्राधान्य देतात, असे एका ट्रॅव्हल एजंटने गोमन्तकला सांगितले.

बरेच पंचतारांकीत हॉटेल्स याकाळात अधिक भाडे आकारतात आणि पैसे कमावतात, असे एका ट्रॅव्हल एजंटने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

मोरजीत अनेक रशियन नागरिकांच्या वतीने हॉटेल आणि रेस्टॉरंट चालवली जातात.

'आम्ही बऱ्याच काळापासून रेस्टॉरंट चालवत आहोत. सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी रेस्ट्रो सुरु आहे त्यामुळे मेनू रशियन आणि इंग्रजी भाषेत आहे.' असे एका रशियन व्यावसायिकाने सांगितले.

'कोरोना महामारीच्या काळात आमच्याकडे बरेच भारतीय काम करत होते आणि बर्‍याच जणांनी इथेच राहून काम करायचे ठरवले', असे दुचाकी भाड्याने देणाऱ्या व्यवसायात असणारे क्लिफोर्ड यांनी सांगितले.

'मोरजी रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. अपघात टाळण्यासाठी सरकार याकडे प्राधान्याने लक्ष देईल', अशी आशा क्लिफोर्ड यांनी व्यक्त केली.

अगस्तो रॉड्रिग्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com