रशियन 'सीरिअल किलर'नं हादरवला गोवा! दोन महिलांच्या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त; आधी मैत्री मग विश्वासघात अन् मृत्यूचा खेळ

Russian Serial Killer Goa: आलेक्सेई याने केवळ एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या महिलांचा गळा चिरुन खून केल्याने तो एखादा 'सीरिअल किलर' असावा.
Russian tourist murder Goa
Russian tourist murder GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने राज्य हादरले असतानाच या प्रकरणातील मुख्य संशयित आलेक्सेई याच्या विरोधात पोलिसांनी आता तपासाचा फास अधिक घट्ट केला. सोमवारी (19 जानेवारी) मांद्रे पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडासाठी वापरलेली धारदार हत्यारे जप्त केली असून या कारवाईमुळे तपासाला मोठी गती मिळाली. आलेक्सेई याने केवळ एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या महिलांचा गळा चिरुन खून केल्याने तो एखादा 'सीरिअल किलर' असावा, असा संशय पोलिसांना असून त्याने गोव्यात असताना आणखी किती गुन्हे केले, याचाही शोध आता घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आलेक्सेई हा गेल्या डिसेंबर महिन्यात (2025) गोव्यात आला होता. तेव्हापासून तो उत्तर गोव्यातील हरमल, मांद्रे, मोरजी आणि कोरगाव अशा विविध भागात राहिला. तो आपल्याच देशातील रशियन महिलांना सहज आपल्या जाळ्यात ओढायचा. तो त्यांच्याशी आधी मैत्री करुन विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. मात्र, हे केवळ खोटे प्रेम आणि विश्वास संपादन करण्याचे त्याचे एक मोठे कारस्थान होते. एकदा का महिलेचा विश्वास बसला की, तो तिच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळायचा आणि काम फत्ते झाल्यावर तिचा काटा काढायचा.

Russian tourist murder Goa
Cyber Crime Goa: काळजी घ्या! गोव्यात सायबर भामट्यांकडून सुमारे 74 कोटींचा चुना! ज्‍येष्‍ठ नागरिक होताहेत टार्गेट

दरम्यान, आलेक्सेई याच्या या क्रूर मानसिकतेच्या दोन रशियन महिला बळी ठरल्या. आलेक्सेईने 14 जानेवारी रोजी मोरजी येथील मधलावाडा येथे 'एलिना' नावाच्या पहिल्या रशियन महिलेचा खून केला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत, म्हणजेच 16 जानेवारी रोजी त्याने हरमल परिसरात 'एलिना' नावाच्याच दुसऱ्या रशियन महिलेचा गळा चिरुन खून केला. एका महिलेकडून (Women) पैसे उकळल्यानंतर तो दुसऱ्या महिलेकडे जात असे आणि तिच्यासोबत एक-दोन दिवस राहून पुन्हा असाच गुन्हा करत असे, अशी धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली. तो सतत जागा बदलत असल्याने आणि एकाच ठिकाणी स्थिर राहत नसल्याने पोलिसांना त्याचा माग काढणे सुरुवातीला कठीण जात होते.

Russian tourist murder Goa
Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

मांद्रे (Mandrem) पोलिसांनी आता या खुनासाठी वापरलेली शस्त्रे जप्त केली असून आलेक्सेईच्या व्हिसा आणि पासपोर्टची देखील पडताळणी केली जात आहे. तो कायदेशीररीत्या भारतात राहत होता की त्याचा व्हिसा संपला होता, याचा तपास सध्या सुरु आहे. मोरजी आणि हरमल सारख्या गजबजलेल्या पर्यटन भागात झालेल्या या क्रूर हत्यांमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रशियन नागरिकांच्या या अंतर्गत वादातून आणि पैशांच्या हव्यासातून झालेल्या हत्यांमुळे गोव्याच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आलेक्सेई सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून या खुनामागचे नेमके कारण आणि त्याने केलेल्या इतर संभाव्य गुन्ह्यांची माहिती काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com