Panaji: ड्रग्ज प्रकरणातील रशियन आरोपी सुनावणी होताच झाला फरार, पोलिसांना दिला चकवा

ड्रग्स प्रकरणात संशयिताला करण्यात आली होती अटक
Russian suspect absconding
Russian suspect abscondingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: पणजी येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या इमारतीमधून संशयित आरोपी रशियन नागरिक फरार झाल्याची घटना घडली आहे. संशयित आरोपी माकारोव मॅक्सीम याला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली होती. आज बुधवारी संशयिताला फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. सुनावणी नंतर संशयित फरार झाला. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Russian suspect absconding
Goa Government Job : गोव्यात तब्बल 80 हजार रुपयांच्या सरकारी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी 29 सप्टेंबर 2022 रोजी गोवा पोलिसांनी माकारोव मॅक्सीम या रशियन नागरिकाला 9 लाख रुपये किमतीचे 900 ग्रॅम चरस हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर गोव्यातील मोरजी येथे छापा टाकून त्याला रंगेहात पकडले. यानंतर आज त्याला पणजी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सुनावणी झाल्यानंतर हा आरोपी इमारतीमधून फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com