Goa Government Job : गोव्यात तब्बल 80 हजार रुपयांच्या सरकारी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

कंत्राटी तत्वावर/ लिव्ह वॅकेन्सी बेसिस अर्थात रजा रिक्त जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखत
Government Jobs| Goa News
Government Jobs| Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

job in goa : गोव्यात सरकारी नोकरीच्या शोधात असला तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. गोवा मेडीकल कॉलेज, बांबोळी यांनी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार, गोवा मेडीकल कॉलेज येथे पूर्णतः कंत्राटी तत्वावर/ लिव्ह वॅकेन्सी बेसिस अर्थात रजा रिक्त जागांच्या भरतीसाठी थेट मुलाखत होणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यक 1 जागा व फिजीयोलॉजी विषयातील सहाय्यक व्याख्याता 1 जागा अशा एकूण 2 जागांसाठी ही थेट मुलाखत होणार आहे. ही जाहीरात 13 डिसेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आली.

Government Jobs| Goa News
Goa Mining : गोव्यातील खनिज ब्लॉक्सचा आजपासून ई-लिलाव

डीन कार्यालय, गोमेकॉ - बांबोळी येथील कॉन्फरन्स हॉल येथे मुलाखत होणार आहे. या पदांसाठी उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे (सरकारी नोकरांसाठी शिथिलक्षम) असणार आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक

पदांसाठीची जागा 1 असणार आहे.

पदांचा प्रकार

रुजू झाल्याच्या तारखेपासून दि. 31/10/2024 पर्यंत किंवा नियमित कर्मचारी पदावर रुजू होईपर्यंत जे आधी असेल त्यानुसार

शैक्षणिक पात्रता

S.S.C.E. किंवा विज्ञान विषयासह तत्सम तसेच कोंकणी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून प्रयोगशाळा सहाय्यक (किंवा अटेंडंटचा) अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा. किंवा किमान एक वर्ष प्रयोगशाळेतील कामाचा अनुभव असावा तसेच मराठी भाषेचे ज्ञान हे ऐच्छिक असणार आहे.

वेतन

23 हजार 28 रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.

Government Jobs| Goa News
Miramar Beach: सकारात्मक! आता दिव्यांगानाही मिरामारचे सौंदर्य अनुभवता येणार

फिजीयोलॉजी विषयातील सहाय्यक व्याख्याता

पदांसाठीची जागा 1 असणार आहे.

पदांचा प्रकार

लिव्ह व्हेकेन्सी तत्वानुसार दि. 24/04/2023 पर्यंत किंवा अधिकारी तिच्या कर्तव्यात रुजू होईपर्यंत यापैकी जे आधी असेल त्यानुसार

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता. जी भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 च्या पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूचीच्या भाग II मध्ये (परवाना पात्रता व्यतिरिक्त)समाविष्ट आहे. तृतीय अनुसूचीच्या भाग II मध्ये समाविष्ट असलेल्या शैक्षणिक पात्रता धारकांनी भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 च्या कलम 13 चे उप-कलम (3) मध्ये नमूद केलेल्या अटी देखील पूर्ण केल्या पाहिजेत. कोकणीचे ज्ञान आवश्यक आहे. संबंधित स्पेशलिटी विषयामध्ये पदव्युत्तर पदवीसाठी नोंदणीकृत तसेच मराठीचे ज्ञान हे ऐच्छिक असणार आहे.

वेतन

80 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी मुलाखतीची वेळ 22/12/2022 रोजी सकाळी 10.30 वाजता असणार आहे. उमेदवाराने सकाळी 10.00 वाजता दस्तऐवज पडताळणीसाठी प्रमाणपत्र प्रशस्तिपत्रांच्या मूळ प्रती आणि फोटो कॉपीसह उपस्थित रहावे. 10.30 नंतर उशिरा आलेल्या उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.

फिजियोलॉजी विषयातील सहाय्यक व्याख्याता या पदासाठी मुलाखतीची वेळ दि. 22/12/2022 रोजी दुपारी 03.30 वाजता असणार आहे. उमेदवाराने दुपारी 2.30 वाजता कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रमाणपत्र प्रशस्तिपत्रांच्या मूळ प्रती आणि फोटो कॉपीसह उपस्थित रहावे. दुपारी 2.30 नंतर उशीरा आलेल्या उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.

वॉक इन इंटरव्ह्यू अर्थात मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही टी.ए.डी.ए. दिला जाणार नाही. अधिक तपशिलांसाठी किंवा सूचनांसाठी किंवा निवड प्रक्रियेसाठी, निकाल इत्यादी माहितीसाठी गोमेकॉच्या वेबसाइटला भेट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com